JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खई के पान…पण शुगर फ्रीवाला, सोन्याचा वर्ख असलेलं खास मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल, कुठे? पाहा VIDEO

खई के पान…पण शुगर फ्रीवाला, सोन्याचा वर्ख असलेलं खास मधुमेह रुग्णांसाठी स्पेशल, कुठे? पाहा VIDEO

भारतीय संस्कृतीचा भाग असलेलं आणि जेवणानंतर अनेकांना हमखास आठवणारं पानही आता मुंबईमध्ये चक्क शुगर फ्री मिळतंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 19 मे : एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्याला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. एखादा अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं त्यांच्या रक्तामधील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे खास या रुग्णांसाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो. भारतीय संस्कृतीचा भाग असलेलं आणि जेवणानंतर अनेकांना हमखास आठवणारं पानही आता मुंबईमध्ये शुगर फ्री मिळतंय. काय आहेत या पानाची वैशिष्ट्य? या स्पेशल पानाची किंमत काय आहे? हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. छोट्याशा हिरव्या पानाचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की पान हे फक्त एक मजेदार आणि चविष्ट पान नाही तर ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. खाण्याच्या हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.

मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या  ‘द पान स्टोरी’ या दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खाण्याचे पान मिळतात. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी खास डायबिटीज पान तयार करण्यात आल आहे. ‘शुगर फ्री’ असं याचं नाव असून यामध्ये  वेलची, लवंग, खोबरं, भाजकी बडीशोप, धना डाळ, काजू बदाम, हरी पत्ती, केसर, सोन्याचा वर्ख याचा समावेश करण्यात आला आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांच्या शरिरातील कोणत्याही प्रकारची साखरेची पातळी हे पान खाल्ल्यावर वाढत नाही. धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO कशी सुचली कल्पना? ‘सध्या आपण कुठेही बाहेर गेलो की  शुगर फ्री पदार्थांची चौकशी करतो. आईस्क्रीम, चहा, केक, जेवणाचे वेगवेगळे पदार्थ हे शुगर फ्री पदार्थ मिळतात. त्याचप्रमाणे ग्राहकांना शुगर फ्री पानांची चौकशी ग्राहकांकडून होत होती. ग्राहकांची ही मागणी लक्षात घेऊनच आम्ही या पानाची निर्मिती केली. आज दिवसभरातील एकूण विक्रीच्या दहा टक्के ही शुगर फ्री पानांची विक्री होते, अशी माहिती द पान स्टोरीचे मालक नौशाद शेख यांनी दिली. या पानांमध्ये अनेक औषधी पदार्थ आहेत. जेवणानंतरच्या पचनक्रियेसाठी ही पान उत्तम आहे.  50 रुपयांपासून या पानाची किंमत असून यामधील सर्वात प्रिमियम पानाची किंमत ही 700 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या