जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO

धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO

धनगर मटन, चुलीवरची LIVE भाकरी, पुण्यात या कधी पैलवान थाळी खायला, ठिकाण? पाहा हा VIDEO

पुण्यातील या हॉटेलमध्ये प्रवेश करताच अगदी मराठमोळा फिल येतो. नावाप्रमाणेच इथं अनेक रांगडे पदार्थ चाखायला मिळतात.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 18 मे : पुण्यातील प्रत्येक गोष्टीची जगात चर्चा होत असते. पुण्यातील शिक्षण, पुण्यातील फॅशन, पुणेरी पाट्या, त्याचबरोबर पुण्यातील खाद्यपरंपराही जगभरात फेमस आहे. घरगुती महाराष्ट्रीयन पद्धतीपासून ते जगभरातील हटके पदार्थ पुण्यात मिळतात. पुण्यातील प्रत्येक भागात फेमस हॉटेल्स आहेत.या हॉटेल्सची खास वैशिष्ट्य आहेत. मराठमोळे ‘रांगडा’ पुण्यातील कर्वेनगरमधील शाहू कॉलनीमध्ये फुटबॉल कोर्टच्या अगदी बाजूला ‘रांगडा’ हे एक हटके हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये प्रवेश करताच अगदी मराठमोळा फिल येतो. आजकाल हॉटेल्समध्ये जेवणासोबतच वातावरण ही देखील महत्त्वाची बाब मानली जाते. रांगडा हॉटेलमधील मराठमोळा अ‍ॅम्बियन्स तुमच्यातील खवय्याला लगेच खूश करतो.

News18लोकमत
News18लोकमत

हॉटेलमधील डाव्या हातालाच तुम्हाला कुस्तीचे एक शिल्प दिसेल. त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्याबद्दलची माहिती सांगणारे काही फोटो देखील लावण्यात आलेत. अगदी देशी पद्धतीची बैठक व्यवस्था या हॉटेलमध्ये असून त्यामधील माहोलही तसाच आहे. चुलीवरची भाकरी Live या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं तुमच्या समोरच चुलीवरची भाकरी थापली जाते. त्याचबरोबर नॉनव्हेजचे रांगडे प्रकार इथं चाखायला मिळतात. त्यामुळे नॉनव्हेजप्रेमींसाठी हे हॉटेल म्हणजे एक पर्वणीच आहे. इडलीची फॅक्ट्री! दिवसाला बनतात 40 हजार इडली, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक, पाहा Video पिठलं भाकरी, महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी थाळी, अंडा थाळी, रेग्युलर मटन थाळी, रांगडा स्पेशल मटन भाकरी, धनगरी मटन भाकरी, रांगडा स्पेशल बॉयलर ताट, गावरान चिकन भाकरी आणि पैलवान थाळी अशा थाळ्यांची मेजवानी पुणेकरांना या ठिकाणी चाखायला मिळेल. त्याचबरोबर तब्बल पासष्ट प्रकारचे आणखीन वेगळे पदार्थही इथं मिळतात. जिभेवर रेंगाळणारी आणि पोटासोबतच मन तृप्त करणारी चव तीही रांगड्या पद्धतीनं अनुभवण्यासाठी या हॉटेलला एकदा भेट दिलीच पाहिजे.

गूगल मॅपवरुण साभार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात