JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काळ्या पाठीचे खेकडे कधी खाल्ले का? कोल्हापुरात भरलाय बाजार, किंमत ?

काळ्या पाठीचे खेकडे कधी खाल्ले का? कोल्हापुरात भरलाय बाजार, किंमत ?

नेहमीच तांबडा-पांढऱ्या रस्सावर ताव मारणारे कोल्हापूरकर पावसाळ्यात खेकडा बाजाराची वाट धरतात. पाहा कसा असतो येथील खेकडा बाजार..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 24 जुलै : कोल्हापूर आणि पावसाळा या दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा बऱ्याच खास गोष्टींची आपल्याला आठवण होते. मग त्यात कोल्हापुरातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांच्या ठिकाणी काढण्यात आलेली वर्षा सहल असुदेत, नाहीतर फक्त पावसाळ्यात बघायला मिळणाऱ्या काही गोष्टी. त्यातच नेहमी तांबडा-पांढरा रस्सावर ताव मारणाऱ्या कोल्हापूरच्या खवय्यांना पावसाळ्यात उत्सुकता असते ती पंचगंगेच्या काठावर भरणाऱ्या खेकड्याच्या बाजाराची. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी असंख्य कोल्हापूरकर आपली मांसाहारातील खेकडा खाण्याची इच्छा पुरी करून घेत असतात. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या पलीकडे साधारण पावसाळा सुरू झाल्यानंतर हा खेकड्यांचा बाजार दरवर्षी भरत असतो. आसपासच्या भागातून अनेक मासे आणि खेकडे विक्रेते या ठिकाणी येत असतात. तर मटण चिकन म्हणजे जीव की प्राण असणारे कोल्हापूरकर पावसाळ्यात खेकड्यांचा बेत आखून या ठिकाणी गर्दी करत असतात.

कुठून पकडून आणले जातात हे खेकडे ? पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की नदीकाठच्या पांदित हे खेकडे येत असतात. कोल्हापूरच्या बांबवडे, बाजारभोगाव, मलकापूर आदी भागांमध्ये ते पकडले जातात. हे खेकडे पकडण्याचे कसब काही जणांना अगदी उत्तम प्रकारे माहीत असते. त्यामुळे हे खेकडे पकडणारे वेगळे आणि विकणारे वेगळे असतात. खास टोपलीत पकडले जातात खेकडे.. हे खेकडे पकडण्यासाठी खास वेताची टोपली बनवलेली असते. या टोपलीत खेकड्यांसाठी खाद्य ठेवून ती टोपली ओढ्यात, पांदित ठेवून दिली जाते. काही वेळाने या टोपलीत अनेक खेकडे पकडले गेले असतात. एकदा या टोपलीत गेल्यानंतर या खेकड्यांना टोपलीच्या विशिष्ट आकार आणि बांधणीमुळे बाहेर येता येत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. नाश्त्यासाठी पौष्टिक थालीपीठ कसं बनवाल? पाहा सोपी पद्धत PHOTOS काय आहे सध्याचा दर? यावर्षी अधिक श्रावण महिना आला असल्यामुळे लोकांना मांसाहार करावा की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे दरवर्षी पेक्षा थोडी कमी विक्री होत असल्याचे येथील खेकडे विक्रेत्यांनी सांगितले. तर सध्या अगदी लहान खेकडे 70 रुपयांपासून ते 100 रुपयांना मिळत आहेत. तर त्यापेक्षा मोठे 3-4 खेकडे हे 300 रुपयांपासून 400 रुपयांना मिळत आहेत. ही किंमत खेकड्याच्या आकारावरून आणि वजनावरुन ठरत असल्याने या ठिकाणी एखाद्या वेळी 600 ते 700 रुपयांना देखील सर्वात मोठा खेकडा विकला गेल्याचे विक्रेते सांगतात. खेकडा आरोग्यास उत्तम.. ताज्या खेकड्याचे कालवण आणि रस्सा हा आरोग्याला देखील उत्तम असतो. मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, त्वचाविकार, वजन नियंत्रण आदी अनेक आजारांसाठी खेकड्याचे सेवन उत्तम मानले जात असल्यामुळे बरेच जण याला पसंती देतात. दरम्यान, नेहमी चिकन, मटण खाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या ताटात आता या दिवसात हमखास खेकडे पाहायला मिळत असतात. त्यामुळे कोल्हापूरकर नॉनव्हेज साठी कोणत्याही बाबतीत कमी पडत नाहीत, असेच म्हणणे योग्य ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या