JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सातासमुद्रापार फेमस असलेलं कोल्हापुरी मटणाचं लोणचं कसं बनतं? पाहा Recipe Video

सातासमुद्रापार फेमस असलेलं कोल्हापुरी मटणाचं लोणचं कसं बनतं? पाहा Recipe Video

Kolhapur News : कोल्हापुरी मटण लोणचं हा पारंपारिक पदार्थ कोल्हापूरकरांचा जीव की प्राण आहे. कसं बनवतात मटण लोणचं जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 14 मार्च :  कोल्हापुरात मटणाचे विविध पदार्थ अगदी मनसोक्त खाल्ले आणि बनवले जातात. त्यात कोल्हापुरी मटण सुक्का, मटण रस्सा, मटण खिमा, मटण बिर्याणी अशा बऱ्याच पदार्थांचा समावेश असतो. या सगळ्या पदार्थांबरोबरच कोल्हापुरी मटण लोणचं हा पारंपारिक पदार्थ कोल्हापूरकरांचा जीव की प्राण आहे. हे मटण लोणचं सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. लोणचं म्हटलं साधारणतः आपल्याला आंबा, लिंबू, मिरची अशा प्रकारच्या लोणच्यांची आठवण होते. मात्र, कोल्हापुरात मटणाचे लोणचे बनवले जाते. हे लोणचे देखील इतर लोणच्यांप्रमाणे आपण बरेच दिवस साठवून ठेवू शकतो. त्यामुळे कोल्हापूरच्या मौसमी पोवार ऑर्डर प्रमाणे हे अशा प्रकारचे लोणचे पारंपरिक पद्धतीने बनवून देतात.

लोणचं बरेच दिवस टिकत मटण लोणचं ही एक कोल्हापुरी स्पेशल शाही डिश आहे. हे लोणचं बरेच दिवस टिकत असल्यामुळे हे लोणचं प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा बाहेरगावी खास पाहुण्यांना देण्यासाठी आवर्जुन तयार बनवून घेतले जाते. आमच्या घरी पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने मटण लोणचं बनवले जाते. गेली 5-6 वर्ष झाले मी हे मटण लोणचं ऑर्डर प्रमाणे बनवून देत आहे. कोल्हापूर आणि भारताबाहेर देखील हे मटण लोणचं पोहोचले आहे. खरंतर लोणचं हे एखादा छोटा चमचा घेऊन वाढण्याची रीत आहे. मात्र, कोल्हापुरात हे भाजी किंवा सुकं मटण वाढावे तसेच द्यावे लागते, असे मौसमी पोवार यांनी सांगितले. कसे बनवले जाते मटण लोणचं? 1) मटण लोणचं बनवण्यासाठी किमान साडे तीन ते चार तासांचा वेळ लागतो. 2) मटणाचे लोणचं बनवण्यासाठी त्या पद्धतीने मटणाचे तुकडे करायला सांगूनच मटण विकत घ्यावे. याला कमी हाडे असलेले आणि मऊ मटण घ्यावे लागते. 3) मटणाचे तुकडे स्वच्छ धुवून चाळणीत पाणी नितळून घ्यावे. 4) मटणाला गरम मसाला, मीठ, बुक्का, मटण मसाला, आमचूर पावडर, आले-लसूण-कोथिंबीरची पेस्ट लावून एक ते दीड तास मसाला मुरण्यासाठी ठेवावा. 5) त्यानंतर हे मटण फ्राय पॅनमध्ये अगदी थोड्याशा तेलात मंद गॅसवर पाऊण तास शिजवून/वाफवून घ्यावे. यावेळी जराही पाणी वापरू नये. याला पाण्याचा हात लावून चालत नाही. तसे झाले तर मटण लोणचं लवकरच खराब होते. 6) मटण पूर्ण शिजल्याची खात्री झाल्यानंतर ते काढून घेऊन तेलात पुन्हा एकदा तळून घ्यावे. तळताना त्यामध्ये थोड्या मिरच्या देखील टाकाव्यात. यामुळेही एक वेगळीच चव येते. 7) तळून झाल्यावर मटण लोणचं करण्यासाठी मोठी कढई घ्यावी. त्यामध्ये जाडी भरडी क्रश केलेली आले-लसूण-कोथिंबीर, तीळ, खसखस, गरम मसाला, मटणासाठीचा खास मसाला, आमचूर पावडर, हळद, मीठ, हिंग हे सगळं घालून मटण एकत्र करून घ्यायचं. 8) त्यानंतर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुके खोबरे घालावे आणि वरून लिंबू पिळून घ्यावा. 9) हे तयार झालेले मटण लोणचं पूर्ण थंड झाल्याशिवाय पॅक करु नये. त्याला पूर्ण थंड होऊ द्यावे. वरील सर्व कृती चिकन लोणचं बनवताना देखील सारखीच आहे. फक्त चिकन लोणचं बनवताना चिकन शिजवून किंवा वाफवून घ्यावे लागत नाही. मसाला मुरण्यासाठी ठेवलेले चिकन फक्त तळून घ्यावे, असे देखील मौसमी यांनी सांगितले.

कोल्हापूरला ‘याड’ लावणारं हुरड्याचं थालीपीठ कसं करतात? पाहा Recipe Video

संबंधित बातम्या

काय आहे किंमत? त्याचबरोर आम्ही हे मटण लोणचं घरगुती मसाले वापरूनच बनवतो. त्यामुळे बाहेरच्या बऱ्याच लोकांना याची चव आवडत आहे. बरेचजण आम्हाला ऑर्डर देऊन, हे लोणचं बनवून बाहेर घेऊन जातात. सध्या आम्ही बनवलेले मटण लोणचं अमेरिका, लंडन, दुबई बेल्जियम पर्यंत गेले आहे. यातील चिकन लोणचं 1150 रुपये प्रति किलो आणि मटण लोणचं 1400 रुपये प्रति किलो प्रमाणे आम्ही बनवून देतो, असे मौसमी पोवार यांचे पती विक्रम पोवार यांनी सांगितले आहे. संपर्क (विक्रांत पोवार) : +919822622826

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या