JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Ramdan 2023 : रमजानमध्येच मिळणारे 'सांधल' खाण्यासाठी मुंबईकर करतात गर्दी, पाहा Recipe Video

Ramdan 2023 : रमजानमध्येच मिळणारे 'सांधल' खाण्यासाठी मुंबईकर करतात गर्दी, पाहा Recipe Video

Ramdan 2023 : या ठिकाणी सांधल हा पदार्थ खाण्यासाठी रमजानच्या महिन्यात मोठी गर्दी असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 4 एप्रिल : मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. याकाळात मुस्लिम बांधव कडक उपवास पाळतात. मुस्लिम बांधव रोज्या दरम्यान सेहरी किंवा इफ्तरीच्या वेळी वेगवेगळे पदार्थ खात असतात. सांधल हा त्यातलाच पारंपारिक पदार्थ आहे.  मुंबई तील मोहम्मद अली रोड मार्गावरील मिराना मशीदच्या गल्लीत फक्त रमजानच्या महिन्यात प्रसिद्ध सांधल हा पदार्थ मिळतो. या ठिकाणी हा पदार्थ खाण्यासाठी रमजानच्या महिन्यात मोठी गर्दी असते. कोण विकत हा पदार्थ? मुंबईत रमजानचा पवित्र महिना हा फक्त मुस्लिम बांधवांसाठीच नव्हे तर येथील खवय्यांसाठीही महत्त्वाचा मानला जातो. मोहम्मद अली रोड मार्गावरील मिनारा मशीदच्या जवळ अमीर खान बेकरी समोर गेल्या 60 वर्षांपासून अभिया कुटूंबीय सांधल हा पदार्थ तयार करून त्याची विक्री करत आहेत. अभिया कुटूंबीय चार पिढ्यांपासून हा पदार्थ बनवत असून सध्या सांधल विक्री करणारे हसनैन आणि मोहम्मद हे दोघं चौथ्या पिढीचे आहेत.

कसा बनवला जातो सांधल पदार्थ? सांधल हा पदार्थ खास करून रमजानच्या महिन्यात तयार केला जातो. मुस्लिम बांधव रोज्या दरम्यान सेहरी, इफ्तरीच्या वेळी सगळ्यात शेवटी हा पदार्थ खातात. तांदळाचं पिठ, साखर, दूध, ड्रायफ्रूट सामग्री वापरू सांधल तयार केलं जातं. रमजान महिन्यात सर्व पदार्थांमध्ये हा एक महत्वाचा पदार्थ मानला जातो. हा पदार्थ तयार करायला 40 ते 45 मिनिटांचा कालावधी लागतो. अगदी पारंपरिक पद्धतीने साधलं हा पदार्थ तयार केला जातो. याची किंमत 40 रुपये नग अशी असते.

Mumbai News : रमजानच्या उपवासाला महागाईची झळ; ‘ही’ फळे महागली, Video

खवव्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी 

संबंधित बातम्या

मोहम्मद अली रोड याठिकाणी मिनारा मशीद जवळ अमीर खान बेकरी समोर गेल्या 60 वर्षांपासून सांधल हा पदार्थ तयार करून त्याची विक्री करत आहोत. यावर्षी सांधल खाण्यासाठी खवव्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा कोरोना नंतर सर्वांना सण उत्सव साजरा करायला मिळत आहे. त्यामुळे लोक सांधल हा पदार्थ खाण्यासाठी उत्सुक होते. पारंपरिक पद्धतीने तयार करून हा लोकांना दिला जातो. रमजान ईद मध्येच सांधल तयार केला जातो,असं साधलं हसनैन अभिया यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या