JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Thane News : श्रावण महिन्यात चिकन खाण्याची झाली इच्छा? तर ट्राय करा हा व्हेज प्रकार, Video

Thane News : श्रावण महिन्यात चिकन खाण्याची झाली इच्छा? तर ट्राय करा हा व्हेज प्रकार, Video

श्रावण महिन्यात चिकन खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही हा व्हेज प्रकार ट्राय करू शकता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ठाणे, 12 जुलै : काही दिवसांनी श्रावण महिना सुरू होणार असून ठिकठिकाणी व्रत - वैकल्य सुरू होतील. यंदाचा श्रावण मास हा 59 दिवसांचा असणार असून या महिन्यात कुठलेही नॉनव्हेज म्हणजेच चिकन, मटण, मासे, अंडी असे पदार्थ खाता येत नाहीत. पण ते खाण्याची इच्छा झालीच तर करायचे काय? याला पर्याय काय? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ठाण्याच्या  बी केबिन परिसरात असलेल्या बल्लाळेश्वर चायनीज भेळ कॉर्नरवर चिकनचिलीचा व्हेज प्रकार म्हणजेच आलूचिल्ली मिळत आहे. याचा आस्वाद तुम्ही श्रावण महिन्यामध्ये घेऊ शकता. बल्लाळेश्वर चायनीज भेळ कॉर्नचे मालक संजय शिंदे आहेत. बल्लाळेश्वर चायनीज भेळ कॉर्नर हे 10 वर्षांपासून ठाणेकराचे मन जिंकत आहे. या ठिकाणी आलूचिल्ली बरोबरच चायनीज भेळ, वेज मंचुरियन, नूडल्स, राइस आणि सूप हे फक्त 10 - 50 या दरात उपलब्ध आहेत. इथं कमी दर असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची देखील या ठिकाणी मोठ्याप्रमाणत गर्दी असते.

आलूचिल्लीचे वैशिष्ट्य काय? आलूचिल्ली हा चिकनचिलीचा व्हेज प्रकार म्हटला जातो. त्यामुळे जी लोक शुद्ध शाकाहारी आहेत ते ही आलूचिल्ली खाऊन चिकनचिल्लीची चव कशी असू शकते याचा अंदाज बांधू शकता. या आलूचिल्लीमधे डार्क सोया सॉस, केचप, विनेगर, रेडचिली सोस, मेयोनिज, कोबी आणि कांद्याची पात घालून तळलेले बटाटे कढईत एक जीव केले जातात. त्याच बरोबर यात चवीनुसार शेजवाण चटणी घालून शेवेसोबत ते प्लेटमध्ये गरमा-गरम सर्व्ह केले जाते.

Dombivli News : लेज आणि चॅाकलेट शेवपुरी कधी खाल्ली का? कधी या मग डोंबिवलीत VIDEO

संबंधित बातम्या

कोणते पदार्थ उपलब्ध आणि त्यांची किंमत ? बल्लाळेश्वर कॉर्नरवर अनेक प्रकारचे व्हेज चायनीज स्टाइल पदार्थ मिळतात. येथील शेव कोबीची चायनीज भेळ ही फक्त 10 रुपयात मिळते. व्हेज मंचुरियन हे 15 रुपये प्लेट असून ते एक्स्ट्रा ड्राय नूडल्स सोबत सर्व्ह केले जाते. एक बाऊल सूप हे 20 रुपयांत मिळत आणि ते एक्स्ट्रा मंचुरियन सोबत सर्व्ह केले जाते. त्याच बरोबर सर्वात जास्त मागणी असलेले व्हेज आलूचिल्ली ही फक्त 20 रुपयांत मिळते, अशी माहिती येथील मालक संजय शिंदे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या