जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Dombivli News : लेज आणि चॅाकलेट शेवपुरी कधी खाल्ली का? कधी या मग डोंबिवलीत VIDEO

Dombivli News : लेज आणि चॅाकलेट शेवपुरी कधी खाल्ली का? कधी या मग डोंबिवलीत VIDEO

Dombivli News : लेज आणि चॅाकलेट शेवपुरी कधी खाल्ली का? कधी या मग डोंबिवलीत VIDEO

Dombivli News : पोट आणि जीभ दोन्ही तृप्त करणारा हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच फेमस आहे.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

डोंबिवली, 28 जून :   शेवपुरी, भेळपुरी रगडा पॅटीस हे बहतेकांच्याच आवडीचे पदार्थआहेत. चटपटीत खायची हुक्की आली की आपल्याला हे पदार्थ हमखास आठवतात. पोट आणि जीभ दोन्ही तृप्त करणाऱ्या या पदार्थांच्या स्टॉलवर नेहमीच गर्दी असते. आपल्या स्टॉलवरील ही गर्दी कायम राहावी यासाठी चाट विक्रेते नवीन आयडिया करत आहेत. डोंबिवलीतील एका विक्रेत्यानं चक्क चॉकलेट लेज शेवपुरी सुरू केलीय. हा हटके पदार्थ तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. कशी तयार करतात डिश? डोंबिवली पूर्वेच्या पेंढारकर कॉलेज रोडला तरुणाईची नेहमी गर्दी असते. या तरूणाईला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची दुकानं या भागात आहेत. पेंढारकर कॉलेज समोरच्या अमन भेळपुरी  या स्टॉलवर ही चॉकलेट लेज शेवपुरी मिळते.

News18लोकमत
News18लोकमत

ओनियन अँड क्रीम लेजचे पाकीट फोडून त्यातील मोठे लेज प्लेट मध्ये ठेवायचे. त्यानंतर त्यात पॅटीस, तिखट चटणी, गोड चटणी , लसूण चटणी , कांदा, टोमॅटो , खिसलेला कोबी , चाट मसाला, मीठ, मसाल्याचे चार-पाच प्रकार यामध्ये एकत्र केले जातात. या सर्वांवर चॉकलेट सॉस, शेव, कोबी, कांदा, टोमॅटो, खिसलेली कॅडबरी टाकून ही डिश तयार केली जाते. चवीला टेस्टी आणि दिसायला हटके असलेली ही चॉकलेट शेवपुरी डोंबिवलीकरांची अतिशय आवडती डिश आहे. एक प्लेट डिशची किंमत 50 रुपये आहे. फक्त 300 रुपये शिल्लक असताना दाखवलं धाडस, डोंबिवलीकरानं तयार केला वडापावचा ब्रँड, Video चॉकलेट लेज शेवपुरीप्रमाणेच कुरकरे रगडा हा येथील पदार्थही फेमस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, टोमॅटो, कांदा, कोबी घालून ते एकत्र परातीमध्ये शिजवलं जातं. हे गरम मिश्रण एका प्लेटमध्ये ओतले जाते. त्यावर कुरकुरे टाकून ही प्लेट सजवली जाते. लेज भेळ, बिंगो भेळ, कुरकुरे भेळ, ड्रायफ्रूट अमन भेळ असे वेगवेगळे प्रकार अमनकडे मिळतात. या सर्व पदार्थांसाठी मसाले घरीच बनवत असल्याची माहिती त्यांनी दिली. कुठे खाणार :  पेंढारकर कॉलेज समोर, आदर्श स्वीट सेंटरच्या बाहेर, रोटरी गार्डन जवळ , डोंबिवली पूर्व, कधी :  संध्याकाळी  5 ते रात्री 10

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात