JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Beed News : आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि हिरवी चटणी, एकदा खाल तर विसरून जाल

Beed News : आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडा आणि हिरवी चटणी, एकदा खाल तर विसरून जाल

आषाढी एकादशीच्या दिवशी घरगुती पद्धतीनं खमंग साबुदाणा वडा खाण्याचा एक पर्याय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 28 जून : आषाढी एकादशी आता काही तासांवर आलीय. त्या दिवशी घरोघरी उपवासाचे पदार्थ केले जातात. हॉटेलमध्येही या दिवशी उपवासाचे खास पदार्थ मिळतात. पण या पदार्थासाठी तेल आणि तूप कोणते वापरतात? उपवासाचे पदार्थ आणि अन्य पदार्थ एकाच भांड्यात करतात की वेगळ्या? असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळे हॉटेलमध्ये उपवासाचे पदार्थ खाणे अनेक जण टाळतात. बीड शहरात अस्सल घरगुती पद्धतीनं गरमागरम साबुदाणा वडे मिळतात. ते चांगलेच फेमस आहेत. खात्री नव्हती… बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये तात्याराव जगदाळे यांनी 2014 साली एका छोट्याश्या गाड्यावर साबुदाणा वड्याचा व्यवसाय सुरू केला.  नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्तानं घरापासून दूर राहत असलेल्या नागरिकांना साबुदाणा वडाचा अस्वाद घेता यावा. त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी शुद्ध, स्वच्छ आणि गरमागरम साबुदाणा वडे मिळावे, हा आमचा उद्देश आहे,’ असे जगदाळे यांनी सांगितले.

साबुदाणा वडे हे घरीच केलेले खाल्ले जातात. उपवासासाठी अनेकदा बाहेरचे पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे आमचे वडे कुणी खाईल का? हा मला प्रश्न होता. त्यावेळी मी घरगुती पद्धतीनं साबुदाणा वडे देण्याचं ठरवलं.  घरगुती पद्धतीने तयार केलेले गरमागरम खुसखुशीत वडे आणि सोबत हिरव्या मिरचीची चटणी बीडकरांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली. सुरूवातीला 20 ते 25 प्लेट विक्री होत असे. आता 100 ते 125 प्लेटची विक्री होते, असा अनुभव जगदाळे यांनी सांगितला. प्राध्यापकाकडे 200 पेक्षा जास्त आडकित्याचा अनोखा संग्रह, पाहा Video जगदाळे यांच्या स्टॉलवरील एक प्लेट साबुदाणा वड्याची किंमत यापूर्वी 20 रुपये होती. ती आता 25 रुपये झालीय, पण ग्राहकांचा प्रतिसादही चांगलाच वाढलाय. घरगुती चव असल्यानंच इथं नेहमी गर्दी असते, असं ग्राहकांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या