जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji Nagar News : प्राध्यापकाकडे 200 पेक्षा जास्त आडकित्याचा अनोखा संग्रह, पाहा Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : प्राध्यापकाकडे 200 पेक्षा जास्त आडकित्याचा अनोखा संग्रह, पाहा Video

Chhatrapati Sambhaji Nagar News : प्राध्यापकाकडे 200 पेक्षा जास्त आडकित्याचा अनोखा संग्रह, पाहा Video

छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाने 200 पेक्षा जास्त आडकित्याचा संग्रह केला आहे. कसा केला संग्रह पाहा.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

छत्रपती संभाजीनगर, 27 जून : प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतोच, जो त्याला जगण्यामधील आनंद देत असतो. असाच एक छंद  छत्रपती संभाजीनगरमधील  सेवा निवृत्त प्राध्यापकाला आहे. या प्राध्यापकाने आतापर्यंत तब्बल 200 पेक्षा जास्त आडकित्याचा संग्रह केला आहे. या संग्रहामध्ये वेगवगेळ्या प्रकारचे आडकित्ते त्यांच्याकडे आहेत. कशी झाली सुरुवात? छत्रपती संभाजीनगरमधील या प्राध्यापकाचे नाव डॉ.अनिल मुंगीकर आहे. ‘माझ्या घरी लहानपणापासूनच माझे आजोबा, आई-वडील पान खात होते. त्यामुळे पान सुपारीचा डब्बा आमच्या घरी होता. त्या डब्ब्यामध्ये आडकित्ता होता. तेव्हा मला आडकित्ता वापरायची संधी मिळाली. मी सेवा निवृत्त झाल्यानंतर मला वाटले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे आडकित्ते गोळा केले पाहिजे. त्यामुळे मी शहागंज भागामध्ये असलेल्या म्युझियममध्ये गेलो. आडकित्ते गोळा करावं असं मला वाटलं म्हणून मी गोळा करायला सुरुवात केली. गेल्या 16 वर्षांपासून मी आडकित्ते गोळा करत आहे’, असं डॉ.अनिल मुंगीकर सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

कोणत्या प्रकारचे आडकित्ते आहेत? चांदीचे आडकित्ते, मोराचे आकाराचे आडकित्ते, बारीक नक्षीकाम असलेली आडकित्ते, माशाच्या आकाराचे आडकित्ते, घोड्याच्या आकाराचे आडकित्ते, पालखी आडकित्ता, प्राण्यांच्या आकाराचे आडकित्ते, मेल आणि फीमेल आकाराचे आडकित्ते, घुंगराचे आडकित्ते, मुघलाइन आडकित्ते या प्रकारचे आडकित्ते अनिल मुंगीकर यांच्याकडे आहेत. यामध्ये सर्वात महाग आडकित्ता चांदीचा आहे. त्याची किंमत साधारणता आठ ते नऊ हजाराच्या घरामध्ये आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : 120 भाकड गायींसाठी त्याने मोसंबीची बाग दिली सोडून, चाऱ्यासाठी हवी आणखी मदत

कुठून मिळवले आडकित्ते? मी हे आडकित्ते गोळा करण्यासाठी जुन्या बाजारात जातो तसेच भाडे असणाऱ्या दुकानदारांना सांगून ठेवले आहे की भंगारामध्ये आडकित्ते आले की सांगा. त्याचबरोबर मी ऑनलाईन आडकित्ते मागवलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मद्रास, राजस्थान, जामनेर इथून मागवले आहेत. जर मी कुठे बाहेरगावी गोलो तर तिथल्या दुकानांमध्ये आडकित्ते खरेदी करतो. आता माझ्याकडे 200 पेक्षा जास्त आडकित्ते आहेत, असं अनिल मुंगीकर सांगतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात