JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दुबईची अस्सल बिर्याणी आता बदलापुरात! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, पाहा Video

दुबईची अस्सल बिर्याणी आता बदलापुरात! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, पाहा Video

बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. ठाणे जिल्ह्यातल्या एका हॉटेलमध्ये थेट दुबई स्टाईल बिर्याणी मिळते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जुलै :  बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरही बिर्याणी चांगलीच ट्रेण्ड होत आहे. आज आम्ही आपल्याला अशाही एका बिर्यानीबद्दल सांगणार आहोत. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधल्या एका हॉटेलमध्ये चक्क दुबईच्या पद्धतीची बिर्याणी तयार केली जाते. कशी आहे बिर्याणी? प्रत्येक व्यक्तीलाच चमचमीत पदार्थ खायला आवडत असतात. सुवासिक तांदळाची एक भारी चवदार डिश आणि सर्वांचाच आवडत्या चवीचा भारतीय खाद्यपदार्थ म्हणजे बिर्याणी. बिर्याणीमध्ये पण बरेच वेगवेगळे प्रकार आणि पद्धती आहेत. प्रत्येक भागातील बिर्याणीमध्ये तिथल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव आहे. जो आपल्याला बिर्याणीची चव चाखल्यावर लक्षात येतो. प्रत्येक प्रकारच्या बिर्याणीची रेसिपी वेगळी आहे. प्रत्येक देश, प्रदेश, आणि त्यामध्ये, प्रत्येक घर आणि ते तयार करणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या हाताची चव या बिर्याणीमध्ये छान ट्विस्ट आणते.

बदलापूरच्या विनायक फुलवरे या तरूणानं त्याच्या हॉटेलमध्ये दुबई स्पेशल बिर्याणी उपलब्ध करुन दिलीय. विनायक हा शेफ असून त्याने दुबईमध्ये एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता.  लॉकडाऊननंतर मायदेशी परतल्यावर स्वतःच काय तरी सुरू करायचं या दृष्टीने त्यानं ‘बदलापूर फूड एक्सप्रेस’ हे हॉटेल सुरू केलं.   इंडीयन, चायनीज, असे वेगवेगळे प्रकार या हॉटेलमध्ये मिळतात. यामधील बिर्याणी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. काय भडंग, काय कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला, सांगलीची भेळ एकदम ओक्केच! लॉकडाऊन नंतर बऱ्याच वेळा पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊन व कोरोनाच्या परिस्थीती मध्ये गेलो नाही. अश्यावेळी स्वतःच काय तरी सुरू करायचं म्हणून बदलापूर फूड एक्सप्रेस या नावाने हॉटेल सुरू केलं. शेफ असल्यामुळे जेवण बनविण्याची आवड आणि पद्धत माहित होती. दोन वर्ष दुबई येथे काम केलं होतं. त्यामुळे मुंबईत दुबईमधील शेख तसंच अन्य नागरिकांना आवडणारी बिर्याणी आपल्याकडं मिळत नव्हती. त्यामुळे मी दुबई स्पेशल बिर्याणी तयार केली. आमच्याकडे चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी असे वेगवेगळे प्रकार आहे. व्हेज बिर्याणी 700 रू. किलो, चिकन बिर्याणी 800 रू. किलो, मटण बिर्याणी 1200 रू. किलो असून महिन्याला सुमारे 300 किलोच्या जवळपास बिर्याणी बदलापूर परिसरात विक्री होते,’ अशी माहिती विनायक यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या