पन्हं शरीराराला उष्णता आणि उष्माघातापासून वाचवतंच परंतु बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्यादेखील दूर करतं.
शिवहरी दीक्षित, प्रतिनिधी हरदोई, 11 जून : पोटात काहीतरी थंड थंड जावं, असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण साधारणतः पाण्याच्या जागी कोल्ड ड्रिंक पिण्यावर भर देतो. परंतु काही वेळासाठी तोंडाला, घशाला आणि पोटाला थंडावा देणारी ही कोल्ड ड्रिंक अजिबात आरोग्यदायी नसते. त्यामुळे उष्णतेत थंडगार वाटावं यासाठी कोल्ड ड्रिंकपेक्षा अनेकजण आंब्याचं किंवा कैरीचं पन्हं पिण्यावर भर देतात. त्यामुळे उष्णतेने होणाऱ्या त्रासांपासून ते पूर्णपणे सुरक्षित राहतात. खरंतर पन्हं शरीराराला उष्णता आणि उष्माघातापासून वाचवतंच परंतु बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्यादेखील दूर करतं. उन्हाळ्यात, प्रत्येक चौकात दुकानांमध्ये पन्हं सहज उपलब्ध असतं. त्याचबरोबर ते घरीही बनवता येतं. आज आपण त्याचीच रेसिपी पाहूया. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी कैरीचं पन्हं मदत करतं.
कैरीच्या पन्ह्यासाठी मध्यम आकाराच्या कैऱ्या, जिऱ्याची पूड, काळी मिरी, साखर, पुदिना आणि काळं मीठ, इत्यादी पदार्थांची आवश्यकता असते. आता सुरुवातीला कैरी एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा. काही वेळाने त्यातील गर काढून घ्या. आता यात 1-2 कप पाणी घालून ते उकळवा. हा गर थंड झाल्यावर साखर, काळं मीठ आणि पुदिन्याची पानं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पल्पमध्ये थंड पाणी घालून त्यात काळी मिरी आणि जिऱ्याची पूड घाला. यामध्ये बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा. हे पन्हं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 3-4 दिवस पिऊ शकता. Ganpatipule : गणपतीपुळे येथे समुद्राला उधाण; किनाऱ्यावर असलेल्या छोट्या दुकानांना फटका, लाटेत दुकाने उध्वस्त दरम्यान, उन्हाळ्यात कैरीचं पन्हं मुबलक प्रमाणात विकलं जातं. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही ते सर्रास मिळतं. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात पन्हं पिण्यासाठी दुकानांसमोर मोठ-मोठ्या रांगा पाहायला मिळतात. या कडाक्याच्या उन्हाळ्यात उकाड्यावर मात करण्यासाठी यापेक्षा दुसरं चांगलं पेय नाही, असं पन्हं पिणाऱ्या ग्राहकांचं म्हणणं असतं.