JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / व्हायग्रा घेण्याची गरज नाही! लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज फक्त एक गोष्ट करा

व्हायग्रा घेण्याची गरज नाही! लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज फक्त एक गोष्ट करा

लैंगिक आरोग्याकडे (sexual health) लक्ष देणे खूप महत्वाचे आहे, ज्याबद्दल बरेच लोक अजूनही उघडपणे बोलत नाहीत. काही लोकांचे लैंगिक आरोग्य कमी झालेले दिसते, त्यामुळे ते खूप चिंतेत राहतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, व्यायामाचा लैंगिक आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 फेब्रुवारी : कोरोना संसर्गानंतर प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बदललेली पाहायला मिळत आहे.  चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, चिंता, प्रदूषण इत्यादींमुळे लैंगिक आरोग्य (Sexual health) सांभाळणं एक आव्हान झांलं आहे. या छोट्या घटकांचा लैंगिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. नुकतेच, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनात असे म्हटले आहे की जे लठ्ठ आहेत किंवा जे व्यायाम करत नाहीत त्यांच्यापैकी 43 टक्के स्त्रिया आणि 31 टक्के पुरुष लैंगिक आरोग्याने त्रस्त आहेत. म्हणजेच जे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहू शकत नाहीत, त्यांच्या लैंगिक आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. मग असे लोक व्हायग्रा किंवा इतर गोळ्यांचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, मनाला निरोगी ठेवण्यासाठी, आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. पण, लैंगिक स्वास्थ्य बरोबर ठेवण्यासाठीही व्यायाम खूप महत्त्वाचा असल्याचं संशोधनात सांगण्यात आलं आहे. तज्ञ पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही शारीरिक हालचालींचा किंवा कोणत्याही स्वरूपात व्यायाम करण्याची शिफारस करतात. जे लोक आठवड्यातून 2-3 दिवस किमान 30 मिनिटे व्यायाम करतात, त्यांच्या शरीरावर बरेच सकारात्मक परिणाम दिसतात. लैंगिक आरोग्यामध्ये व्यायामाचे फायदे कोणताही एरोबिक व्यायाम केल्याने, रक्ताभिसरण (Blood circulation) वाढते, ज्यामुळे निरोगी रक्ताभिसरण प्रणाली कार्यन्वीत होते. रक्ताभिसरण चांगले राहिल्याने पुरुषांमध्ये इरेक्शन (Erections)होण्यास मदत होते आणि स्त्रियांमध्ये योनीतून लुब्रिकेशन आणि संवेदना (Sensation) होण्यास मदत होते. जेव्हा एखादी व्यक्ती नियमित व्यायाम करते तेव्हा त्याची सहनशक्ती विकसित होते, जी त्याच्या लैंगिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या अभ्यासानुसार, अर्ध्या तासाच्या लैंगिक क्रिया पुरुषांमध्ये 125 कॅलरीज आणि महिलांमध्ये सुमारे 100 कॅलरीज बर्न करू शकतात. Sperm donation | इस्लाममध्ये शुक्राणू दान करण्यास मनाई का आहे? व्यायाम करताना एखादी व्यक्ती आहाराचे पालन करते, ज्यामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि फ्रेश दिसू लागतो. असे केल्याने त्याच्यात आत्मविश्वास वाढतो. जर्नल ऑफ पर्सनॅलिटीमध्ये प्रकाशित 2019 च्या संशोधनानुसार, महिलांना आत्मविश्वास असलेले लोक अधिक रोमँटिक वाटतात. अशी लोक त्यांना अधिक आवडतात. आता असा आत्मविश्वास सुरुवातीपासूनचा असेल किंवा त्याने तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे निर्माण केला असेल याने काही फरक पडत नाही. याशिवाय व्यायामामुळे तणाव कमी होतो. तणाव किंवा चिंता यांचा लैंगिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो, याची तुम्हाला चांगली जाणीव असावी. व्यायामामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होण्यास खूप मदत होते, ज्यामुळे सेक्स ड्राइव्ह चांगली राहण्यास मदत होते. यासोबतच व्यायामाने रक्तदाब नियंत्रित राहतो, मधुमेहासारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो आणि एकूणच आरोग्यही योग्य राहते. किती व्यायाम योग्य आहे? चांगले लैंगिक आरोग्य मिळवण्यासाठी किती व्यायाम करावा, हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. नियमित वेगवान चालणे, हळू चालणे, एरोबिक व्यायाम, वजन प्रशिक्षण व्यायाम यामुळे लैंगिक आरोग्य सुधारू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दररोज 20-30 मिनिटांचा कोणताही व्यायाम लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या