रात्री फ्रिज बंद ठेवून वीज वाचवता येते? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान
अनेकदा उन्हाळ्यात वीजबिज जास्त येत असल्याने तुम्ही वीजबिल कमी करण्यासाठी अनेक उपाय करत असला. याकाळात वीज वाचवण्यासाठी बरेच जण एसी-कूलरसारख्या उपकरणांचा वापर कमी करतात. परंतु कधीकधी वीज वाचवण्याचा प्रयत्न हा तुम्हाला महागात पडू शकतो. एसी-कूलर नंतर, तुमच्या घरातील रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रिज हा इतर उपकरणांच्या तुलनेत सर्वात जास्त विजेचा वीज वापर करतो. रेफ्रिजरेटर दिवसभर सुरू असला तरी वीज वाचवण्यासाठी तो रात्री बंद ठेवला तर काय होईल? याने किती वीज वाचेल? का असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की असे केल्याने फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होतात. रात्री फ्रीज बंद ठेवणे कितपत योग्य? फ्रीज हे असे उपकरण आहे जे त्यात ठेवलेल्या अन्न पदार्थांना नेहमी ताजे ठेवते. परंतु वीज वाचवण्यासाठी काहीजण रात्री फ्रिज बंद ठेवण्याचा विचार करतात. परंतु जर तुम्ही असा विचार करत असाल तर तो विचार अत्यंत चुकीचा आहे. सामान्यत: जेव्हा पॉवर फेल होते तेव्हाच फ्रीज बंद राहतो. पण जास्त वेळ फ्रिज बंद ठेवल्याने आत ठेवलेले अन्न खराब होऊ शकते.
फ्रीज बंद केल्यावर तो फक्त 2 ते 3 तास आतील भाग थंड ठेवू शकतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही रात्री 5-6 तास फ्रिज बंद ठेवण्याचा विचार करत असाल तर ते नुकसान दायक आहे. रात्री फ्रिज बंद ठेवल्यास थंडावा कमी झाल्यामुळे त्यात ठेवलेले अन्न खराब होऊ शकते. फ्रीज बंद ठेवल्यामुळे अन्नाला बुरशी येऊ शकते आणि बुरशीयुक्त अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्यही बिघडू शकते. फ्रीज बंद ठेवल्याने खरंच विजेची बचत होते का? फ्रीज बंद ठेवल्याने तुमची काही प्रमाणात वीज नक्कीच वाचेल पण ती तेवढी फायद्याची नाही. फ्रीज बंद केल्यावर त्यातील तापमान वाढू लागते. जर तुम्ही काही वेळाने फ्रिज रीस्टार्ट केला, तर फ्रिज थंड होण्यासाठी पुन्हा वेळ लागेल. यामुळे फ्रिज बंद ठेवून तुम्ही जितकी वीज वाचवता, तितकीच वीज पुन्हा थंड करण्यासाठी खर्च होईल. Ruturaj Gaikwad & Utkarsha Pawar Wedding : लग्नात ऋतुराज गायकवाडच्या पत्नीचा हटके लूक, मंगळसूत्राच डिझाईन पाहिलंत का? आजकाल फ्रिजमध्ये थर्मोस्टॅट आणि ऑटो-कट-ऑफची सुविधा असते, ज्यामुळे विशिष्ट तापमानापर्यंत थंड झाल्यावर, फ्रिजचा कंप्रेसर आपोआप थांबतो. त्यामुळे फ्रीजही थंड राहतो आणि विजेचीही बचत होते.