JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chocolate Day 2022: गोड दिवसाच्या सेलेब्रेशनमागे आहे रंजक इतिहास, Valentine Week चा महत्त्वाचा दिवस

Chocolate Day 2022: गोड दिवसाच्या सेलेब्रेशनमागे आहे रंजक इतिहास, Valentine Week चा महत्त्वाचा दिवस

Valentine’s week मधला आजचा महत्त्वाचा दिवस. चॉकलेट डे (Chocolate Day 2022) का आणि कसा साजरा केला जातो माहीत आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 9 फेब्रुवारी: प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाइन वीक (Valentine Day) असतो. प्रेमी युगुलं हा आठवडा मोठ्या उत्साहात साजरा करतात. व्हॅलेंटाइन वीकमध्ये अनेक जण आपल्या प्रेमाची कबुली देतात. व्हॅलेंटाइन वीकमधला प्रत्येक दिवस प्रेमी युगुलांसाठी खास असतो. रोझ डे (Rose day date) व प्रपोज डेनंतर (Propose day 2022) व्हॅलेंटाईन वीकच्या (Valentine’s week 2022) तिसऱ्या दिवशी म्हणजेच 9 फेब्रुवारीला चॉकलेट डे (Chocolate day 2022 date) साजरा केला जातो. या दिवशी लव्हबर्ड्स एकमेकांना चॉकलेट देऊन प्रेम व्यक्त करतात आणि त्याचसोबत चॉकलेट डेच्या (Chocolate Day) शुभेच्छाही देतात. तुम्हाला कोणाला सांगायचं असेल, की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, तर तुम्ही त्यांना या दिवशी चॉकलेट गिफ्ट करू शकता. Valentine’s Week: पार्टनरला खूश करण्यासाठी देऊ शकता ही 5 स्पेशल गिफ्ट्स हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास मानला जातो. बाजारात अनेक प्रकारची चॉकलेट्स मिळतात. अनेक जण आपल्या जोडीदारासाठी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनवतात. प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते. सेलिब्रेशन आणि फायदेही (Benefits of Chocolates) चॉकलेट सर्व वयोगटातल्या व्यक्तींना आवडतं. तसंच चॉकलेट हे आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. चॉकलेटमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते रक्तप्रवाहासाठी, हृदयासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात. तसंच चॉकलेट खाल्ल्याने मूडही सुधारतो. चॉकलेट हे कधीही न संपणाऱ्या प्रेमाचं प्रतीक आहे. लोक या दिवशी चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतात. अशा परिस्थितीत, व्हॅलेंटाइन वीकमध्ये या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला चॉकलेट देऊन तुमचं नातं अधिक मजबूत करू शकता. चॉकलेट हे त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतं. जोडीदाराला चॉकलेट्स गिफ्ट करण्याव्यतिरिक्त तुम्ही काही वेगळंदेखील करू शकता. सकाळी नाष्ट्याला तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेटशी संबंधित काही डिशेस बनवू शकता. तसंच स्पामध्ये त्यांच्यासाठी चॉकलेट बॉडी मसाज बुक करू शकता. यामुळे त्यांचा थकवाही निघून जाईल आणि त्यांची त्वचाही चमकदार होईल. तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट केकही बनवू शकता. चॉकलेटचा इतिहास (History of Chocolate) चॉकलेटच्या इतिहासासंदर्भात रंजक गोष्टी आहेत. असं म्हटलं जातं, की अमेरिकेत 4 हजार वर्षांपूर्वी कोकोचं झाड दिसलं होतं. अमेरिकेच्या जंगलात कोकोच्या झाडाच्या बियांपासून चॉकलेट बनवलं जात असे. चॉकलेटवर जगातले पहिले प्रयोग अमेरिका आणि मेक्सिकोने केले. स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर 1528मध्ये कब्जा केला. त्या राजाला कोको प्रचंड आवडलं. यानंतर राजा मेक्सिकोहून स्पेनला कोकोच्या बिया घेऊन गेला, असं म्हटलं जातं. Valentine Week : ..तर आज ‘ते’ सोबत असते! सलमान-ऐश्वर्याची अधुरी ‘प्रेमकहाणी’ 1828 मध्ये कॉनराड जोहान्स वान हॉटन यांनी कोको प्रेस नावाचं मशीन तयार केलं. पूर्वी चॉकलेटची चव तिखट असायची असं म्हटलं जातं. जोहान्सने बनवलेल्या यंत्राच्या साह्याने चॉकलेटचा तिखटपणा दूर केला. आज आपण जे चॉकलेट खातो, त्याची सुरुवात 1848 मध्ये झाली. तेव्हा जे. ए. आर. फ्राय अँड सन्स या ब्रिटिश चॉकलेट कंपनीने कोकोमध्ये बटर, दूध आणि साखर मिसळून ते कडक केले आणि त्याला चॉकलेटचा आकार दिला. अशा परिस्थितीत काळाबरोबर चॉकलेटची चवही बदलत गेली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या