JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'या' एसीमुळे संपूर्ण घर राहील थंड; स्प्लिट, विंडो एसीची भासणार नाही गरज

'या' एसीमुळे संपूर्ण घर राहील थंड; स्प्लिट, विंडो एसीची भासणार नाही गरज

सामान्य एसीच्या तुलनेत हा एसी बसवायला किती खर्च येतो.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : सध्या उन्हाळ्यामुळे एसी, कूलर, पंखे आदींना मागणी वाढली आहे. तीव्र उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी अनेक जण या वस्तू खरेदी करत आहेत. ग्राहकांची गरज आणि मागणीनुसार सध्या बाजारात विविध कंपन्यांचे एअर कूलर्स, एअर कंडिशनर्स आणि पंखे उपलब्ध आहेत. तुम्ही मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा कोणत्याही मोठ्या ऑफिसच्या छतावर सेंट्रल एअर कंडिशनर लावलेला पाहिला असेल. सेंट्रल एअर एसी सिस्टीम घरांमध्ये बसवल्या जाणाऱ्या स्प्लिट किंवा विंडो एसी सिस्टीमपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. मोठ्या खोल्या, हॉल किंवा कॉम्प्लेक्स थंड ठेवण्यासाठी सेंट्रल एसीची गरज भासते. मोठ्या क्षेत्राच्या कूलिंगसाठी सेंट्रल एसी बसवल्यानंतर, स्प्लिट आणि विंडो एसी बसवण्याची गरज भासत नाही. सेंट्रल एसी घरात बसवता येतो की नाही आणि सामान्य एसीच्या तुलनेत हा एसी बसवायला किती खर्च येतो, याविषयी माहिती घेऊ या. 1 बीएचके ते 3 बीएचकेपर्यंतच्या घरात सेंट्रल एसी बसवण्यासाठी किती खर्च येतो याचा एक अंदाज घेऊ या. … तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट असून देखील भरावा लागेल दंड, भारतीय रेल्वेचा हा नियम माहितीय का? एक सेटअप संपूर्ण घर ठेवीस थंड तुमचं घर मोठं असेल तर प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र स्प्लिट एसी आवश्यक आहे. दोनपेक्षा जास्त स्प्लिट एसी लावायचे असतील तर खर्चही वाढतो. घरात सेंट्रल एसी लावला तर तो एकाच वेळी सर्व रूम्स थंड करू शकतो. स्प्लिट एसीच्या तुलनेत सेंट्रल एसी अधिक कार्यक्षम असतात. एक सेंट्रल एसी बसवल्याने अनेक स्प्लिट एसी बसवण्याचा खर्च वाचतो आणि विजेची बचत होते. सेंट्रल एसीमध्ये एक सेंट्रल एअर कंडिशनर युनिट असतं. ते डक्टच्या मदतीने सर्व रूम्समध्ये थंड हवा पोहोचवतं. यामध्ये वेगवेगळ्या रूम्ससाठी हवेचा प्रवाह आणि तापमान सेट करता येतं. सेंट्रल एसी बसवायला लाखो रुपये लागतील, असा विचार तुम्ही करत असाल तर वस्तुस्थिती तशी नाही. सेंट्रल एसी बसवण्यासाठी किती खर्च येतो? सेंट्रल एसी बसवण्याचा खर्च, तो किती क्षेत्रासाठी बसवायचा आहे यावर अवलंबून असतो. सिंगल बेडरूम असलेल्या एका सामान्य घरात सेंट्रल एसी बसवण्यासाठीचा खर्च 50 हजार रुपयांपासून सुरू होतो. दोन किंवा तीन बेडरूम्स असलेल्या घरात हा एसी बसवण्यासाठी एक लाख रुपये खर्च येतो. यापेक्षा मोठं क्षेत्रफळ असेल तर सेंट्रल एसी बसवण्याचा खर्च तीन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या