जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ... तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट असून देखील भरावा लागेल दंड, भारतीय रेल्वेचा हा नियम माहितीय का?

... तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिट असून देखील भरावा लागेल दंड, भारतीय रेल्वेचा हा नियम माहितीय का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रवासाचे तिकीट किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यामुळे प्रवाशाला दंड भरावा लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की प्लॅटफॉर्म तिकिटाचीही वैधता असते?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 मे : जर आपल्याला रेल्वेचा प्रवास करायचा नसेल, पण कोणाच्यातरी मदतीसाठी जायचं असेल तर अशावेळी प्लॅटफॉर्म तिकिट घेण्याचा नियम आहे. ज्यामुळे तुम्ही ट्रेनने प्रवास करु शकत नाही, पण प्लॅटफॉर्मवर थांबू शकता किंवा जाऊ शकता. रेल्वे नियम सांगतात की फक्त तीच व्यक्ती रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाऊ शकते, ज्याच्याकडे रेल्वे प्रवासाचे वैध तिकीट आहे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट आहे. प्रवासाचे तिकीट किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट नसल्यामुळे प्रवाशाला दंड भरावा लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की प्लॅटफॉर्म तिकिटाचीही वैधता असते? हे तिकीट एकदा खरेदी करून तुम्ही दिवसभर रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही. भारतातील एकमेव रेल्वे मार्ग जो आजही इंग्रजांच्या ताब्यात म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी कराल तेव्हा ते फक्त दोन तासांसाठी वैध आहे हे लक्षात असू द्या. तुम्ही दोन तासांपेक्षा जुने किंवा त्या आधीचे प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन रेल्वे स्टेशनवर टीसीकडून पकडले गेल्यास, तुम्हाला विना तिकिट मानलं जाईल आणि तुमच्याकडून विहित दंड आकारला जाईल. रेल्वे वेबसाइट erail.in नुसार, 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन कोणतीही व्यक्ती दिवसभर प्लॅटफॉर्मवर थांबू शकत नाही. एकदा हे तिकीट खरेदी केल्यानंतर ते प्लॅटफॉर्मवर थांबण्यासाठी फक्त दोन तास वापरता येईल.

News18लोकमत
News18लोकमत

जर प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीट एक्सपायर झालं तर रेल्वे तिकीट तपासणारे कर्मचारी किमान 250 रुपये दंड आकारू शकतात. एवढेच नाही तर प्लॅटफॉर्मवर तिकीट किंवा प्रवासाचे तिकीट नसताना प्रवासी पकडले गेल्यास प्लॅटफॉर्मवरून निघालेल्या आधीच्या ट्रेनच्या किंवा ज्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी पकडला आहे त्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या ट्रेनच्या दुप्पट भाडे आकारले जाईल. रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाबद्दल तुम्हाला आणखी एक गोष्ट माहित असावी. रेल्वे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक परिस्थितीत प्लॅटफॉर्म तिकीट देण्यास बांधील नाही. प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या जागेनुसारच प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाते. याचा अर्थ प्लॅटफॉर्मच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट दिले जात नाहीत. जर क्षमतेनुसार प्लॅटफॉर्म तिकीट आधीच जारी केले गेले असेल, तर त्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट मागणाऱ्या व्यक्तीला रेल्वे हे तिकीट देण्यास नकार देऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात