Die-hard fans
नवी दिल्ली, 10 जानेवारी: आपल्याकडे सेलिब्रिटींच्या डाय हार्ट फॅन्सची (Die-hard fans) संख्या अगदी मोठ्या प्रमाणात आहे. दाक्षिणात्य राज्यांमध्ये तर रजनीकांत, पवन कल्याण, महेशबाबू, मम्मूटी अशा कित्येक स्टार्ससाठी अगदी प्राणही देतील असे फॅन्स आहेत. बॉलिवूडमध्येही अमिताभ बच्चन, सलमान, शाहरुख, आमीर अशा खान त्रयींचे किंवा कित्येक अभिनेत्रींचे असे कट्टर चाहते (Celebrity fans) तुम्हाला पहायला मिळतील. तुम्हीदेखील एखाद्या सेलिब्रिटीचे असेच कट्टर फॅन असाल, तर तुमच्यासाठी खरंतर वाईट बातमी आहे. इतर लोकांपेक्षा तुमचा आयक्यू हा कमी (Die-hard fans may have low intelligence) असू शकतो. असं आम्ही नाही, तर हंगेरी देशातील संशोधक म्हणत आहेत. सुंदर दिसण्यासाठी जास्त काही करू नका, फक्त झोपा; जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत हंगेरीमधील 1,763 जणांवर गेल्यावर्षी केलेल्या एका संशोधनातून (Hungarian research on celebrity fans) ही बाब समोर आली आहे. या रिसर्चमध्ये लोकांची एक व्होकॅबलरी टेस्ट (Vocabulary test) आणि डिजिट सिम्बलायझेशन टेस्ट (Digit symbolization test) घेण्यात आली. ही चाचणी सुरू असताना सोबतच त्यांना सेलिब्रिटींबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ज्या लोकांनी सेलिब्रिटींच्या आयुष्यावरील प्रश्नांची अगदी बरोबर उत्तरे दिली, त्यांचा इतर दोन आकलनासंबंधी चाचण्यांमधील परफॉर्मन्स अगदीच खराब राहिला. तर, सेलिब्रिटींबाबत फारशी काही माहिती नसणाऱ्यांचा इतर चाचण्यांमधील परफॉर्मन्स तुलनेने अधिक चांगला राहिला. लहान मुलं अचानक विचारतात असे प्रश्न, तेव्हा गोंधळून जावू नका; या Tips वापरा संशोधक म्हणाले, की कदाचित आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करण्यामध्ये, तिच्याबद्दल माहिती गोळा करून, ती मेंदूमध्ये साठवून ठेवल्यामुळे इतर गोष्टींना जास्त जागा शिल्लक राहत नाही. दुसरीकडे, हुशार लोकांना सेलिब्रिटींच्या झकपक लाईफस्टाईलच्या मागचा फोलपणा माहिती असल्यामुळे ते त्यांच्याकडे इतर फॅन्सपेक्षा कमी प्रमाणात आकर्षित होतात. असाही अंदाज संशोधकांनी व्यक्त केला. मात्र, या एकूण प्रकाराचं नेमकं कारण (Reason yet unclear) त्यांना अद्यापही समजलं नाहीये. ज्या लोकांनी कॉग्निटिव्ह चाचण्यांमध्ये (Cognitive tests) खराब प्रदर्शन केले, ते आधीपासूनच कमी इंटिलिजंट होते का हेदेखील संशोधकांना नीटसे समजले नाही. म्हणजे, आयक्यू कमी असल्यामुळे हे लोक सेलिब्रिटी गॉसिपमध्ये (Celebrity gossip and intelligence level) सहभागी होत जातात, की सेलिब्रिटींच्या मागे धावल्यामुळे आयक्यू कमी होतो हे नक्की सांगता येत नसल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. “या क्षेत्रात आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे. एखाद्या सेलिब्रिटीची अंधभक्ती केल्याने व्यक्तीच्या आकलन क्षमतेवर नेमका काय परिणाम होतो आणि त्यावर काय उपाय आहे याबाबत संशोधन व्हायला हवे.” असे या संशोधकांनी ‘सायपोस्ट’ला (PsyPost) दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दरम्यान भारताबाबत बोलायचे झाल्यास, सेलिब्रिटींच्या डाय हार्ड फॅन्सची (People obsessed with celebrities) संख्या जशी दक्षिणेकडे अधिक आहे; तसाच साक्षरता दरही दाक्षिणात्य राज्यांमध्येच अधिक दिसून येतो. त्यामुळे हंगेरी देशात केले गेलेले हे संशोधन आपल्याकडे कितपत लागू होते याबाबत साशंकता आहे!