मुंबई, 09 जानेवारी : आपल्या लग्नाचा अल्बम पाहताना आपली मुलं अनेकदा असा प्रश्न विचारतात की, मी तुझ्या लग्नात का नव्हतो? मग आपण ती गोष्ट विनोद म्हणून घेतो आणि खूप हसतो. असा प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडतो. ही एक मजेदार गोष्ट आहे. पण कधी-कधी मुलं पाहुण्यांसमोर किंवा घरातील मोठ्यांसमोर असे काही प्रश्न विचारतात (children ask objectionable questions) की, त्यामुळे काही काळ आपण गोंधळू जातो, आपल्याला समजत नाही या परिस्थितीला काय उत्तर द्यावे किंवा कसे सामोरे जावे? मात्र, तुम्हाला याबाबत जास्त काळजी करण्याची गरज नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे, ज्याचा सामना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी करावाच लागतो. यासाठी काही टिप्स फॉलो करून तुम्ही अशा परिस्थितीला सहज सामोरे (Parenting Tips) जाऊ शकता. मुलांशी मोकळेपणाने बोला भारतीय समाजात पालक आपल्या मुलांशी लैंगिक किंवा टॅबू विषयांवर उघडपणे बोलू शकत नाहीत. त्यामुळे मुलांना कुठे, कधी आणि काय विचारावे हे देखील कळत नाही. मात्र, या सर्व गोष्टींसाठी एक वय आहे, ज्यामध्ये आपण खुलेपणाने बोलले पाहिजे. मुलांशी मोकळेपणाने बोलण्यात काही गैर नाही. कारण इंटरनेट आणि मोबाईल मुलांपर्यंत पोहोचला आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. त्यामुळे योग्य वयात तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी तुमच्या मुलांसोबत शेअर करायला अजिबात संकोच करू नका. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात त्यांचे मित्र बना जेव्हा मूल शाळेत जाते किंवा त्याच्या शेजारच्या एखाद्याशी ओळख होते, तेव्हा त्याचे बरेच मित्र बनतात, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या मुलाशी मैत्री करू शकत नाही. अर्थात, तुम्हीही तुमच्या मुलाचे चांगले मित्र होऊ शकता आणि त्यांच्यासोबत गोष्टी शेअर करू शकता आणि त्यांना सल्ला देऊ शकतो. मात्र, त्यांच्या प्रत्येक गोष्टीच्या आडवे येऊ नका, त्यांना स्वातंत्र्य द्या. स्पष्टपणे सांगा तुमच्या मनात संकोच नको मुलांशी बोलत असताना तुम्ही त्यांना सेक्स आणि पीरियड्स यांसारख्या विषयांवर थोडे ज्ञान देऊ शकता. त्यांना या सर्वांची योग्य वयात माहिती देणे ही तुमची जबाबदारी आहे. बलात्कार आणि विनयभंगाबद्दल बोलून, तुम्ही तुमच्या मुलाला त्याचे दुष्परिणामही सांगायला हवेत. तसेच POCSO कायदा काय आहे यावर चर्चा करा. हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र या सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मुलाला सुसंस्कृत बनवू शकता. मुलांच्या प्रश्नावर तुम्ही काहीही शिव्या घालू नका किंवा लपवू नका, हे लक्षात ठेवा. योग्य माहिती द्या. यामुळे तुम्ही आणि तुमच्या बाळामध्ये एक खोल बंध निर्माण होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.