मुंबई, 20 फेब्रुवारी : डोळ्यांचं आरोग्य आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सामान्यतः रुग्णालयात थोडी विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी शस्त्रक्रिया केली त्याचदिवशी घरी जाऊ शकता. पण, काही गुंतागुंत असल्यास, डॉक्टर तुम्हाला रुग्णालयातच थांबण्याचा सल्ला देतात. शक्यतो असं होत नाही कारण बहुतेक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी होतात. शस्त्रक्रियेनंतर तुम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडता तेव्हा, शस्त्रक्रिया झालेल्या डोळ्यावर एक दिवस पॅड आणि प्लॅस्टिक शील्ड ठेवण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. तुमच्या डोळ्यातील संवेदना शस्त्रक्रियेनंतर काही तासांनी परत येणं अपेक्षित असतं. डोळा पूर्णपणे बरा होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. जोपर्यंत तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करत आहात तोपर्यंत घाबरण्याचं काहीही कारण नाही.
डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजीमोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर अंधारी येणं, डोळ्यातून पाणी येणं, अंधूक दिसणं, दुहेरी दिसणं, आणि डोळ्यात लाली येणं सामान्य बाबी आहेत. काही दिवस किंवा आठवड्यानंतर या समस्या नाहीशा होतात. डॉक्टरांनी नवीन चष्मा दिल्यास तुमचा डोळा पूर्णपणे बरा झाल्यानंतर, साधारणतः 2 ते 6 आठवड्यांनंतर तुम्ही त्याचा वापर करू शकता.
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काही आठवड्यात खालील सल्ल्याचं पालन केलं पाहिजे: हे करा : 1. सुरुवातीचे दोन ते तीन दिवस आराम करा. 2. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आयड्रॉप्सचा वापर करा. 3. कमीत-कमी आठवडाभर रात्री तुमच्या डोळ्याला आय शील्ड वापरा. 4. नेहमीप्रमाणे आंघोळ करा. 5. वाचन, टीव्ही पाहणं आणि कॉम्प्युटर वापरण्यात कमी वेळ घालवा. 6. तीन ते चार दिवसांनंतर केस धुताना आय शील्ड वापरा. 7. घराबाहेर जाताना आयशिल्ड किंवा सनग्लासेस वापरा. 8. चार ते सहा आठवडे पोहायला जाऊ नका. 9. जर तुमच्या दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी खराब असेल तर शस्त्रक्रिया केलेल्या डोळ्याची दृष्टी परत येईपर्यंत काळजी घेण्यासाठी मदनीसाची व्यवस्था करा. हे करू नका : 1. डोळे चोळू नका. 2. साबण किंवा शॅम्पू तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. 3. डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच गाडी चालवा. 4. जास्त व्यायाम किंवा घरकाम टाळा. 5. किमान चार आठवडे डोळ्यांचा मेकअप करणं टाळा. 6. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला मिळत नाही तोपर्यंत विमानानं प्रवास करू नका. याशिवाय, शस्त्रक्रियेनंतर दररोज सकाळी ऑपरेट केलेल्या डोळ्यासाठी ड्रॉप वापरा. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करा. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये, तुम्हाला दिवसातून दोनदा डोळे स्वच्छ करावे लागतील. कारण, ड्रॉप्स आणि उपचार प्रक्रियेमुळे डोळ्यांना थोडासा चिकटपणा येऊ शकतो.
साध्या वाटणाऱ्या या सवयींमुळे डोळ्यांचे होते नुकसान! तुम्ही अशी चूक करत नाही ना?हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनं तुमची दृष्टी सुधारण्यात यश मिळतं. तुम्हाला लवकरच सामान्य अॅक्टिव्हिटी सुरू करता येतात. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन केल्यास आणि मोतीबिंदूवर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विविध उपाययोजना केल्यास रुग्ण लवकर बरे होऊ शकतात.