JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नर्व्हस सिस्टीममध्ये समस्या झाल्यास होतात मेंदूशी संबंधित आजार! या लक्षणांकडे दुर्लक्ष टाळा

नर्व्हस सिस्टीममध्ये समस्या झाल्यास होतात मेंदूशी संबंधित आजार! या लक्षणांकडे दुर्लक्ष टाळा

मज्जासंस्थेमुळे आपण चालणं, बोलणं, वास घेणं, पाहणं असे अनेक अनुभव घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या जगाशी सतत जोडलेले राहू शकतो. त्यात छोटासा जरी बिघाड झाला, तरी त्याचा मोठा परिणाम शरीरावर, मनावर होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 मार्च : माणसाच्या शरीरात असलेली मज्जासंस्था म्हणजेच नर्व्हस सिस्टीम हे एक खूप मोठं आणि गुंतागुंतीचं जाळं आहे. याच मज्जासंस्थेमुळे आपण चालणं, बोलणं, वास घेणं, पाहणं असे अनेक अनुभव घेऊ शकतो. आपल्या आजूबाजूच्या जगाशी सतत जोडलेले राहू शकतो. त्यात छोटासा जरी बिघाड झाला, तरी त्याचा मोठा परिणाम शरीरावर, मनावर होतो. मज्जासंस्थेच्या आजारांची अनेक लक्षणं असतात. त्यापैकी काही सामान्य लक्षणांबाबत बेंगळुरूच्या कावेरी रुग्णालयातल्या कन्सल्टंट न्यूरॉलॉजिस्ट आणि एपिलेप्टोलॉजिस्ट डॉ. सोनिया तांबे यांनी माहिती दिली आहे. डोकेदुखी मज्जासंस्थेच्या विकारांमधील डोकेदुखी हे खूप सामान्य लक्षण आहे. मानेच्या वरच्या कोणत्याही भागातील दुखणं हे डोकेदुखी असं समजलं जातं. डोकेदुखी, मायग्रेन, तणावामुळे आलेली डोकेदुखी, क्लस्टर हेडेक किंवा सेकंडरी हेडेक म्हणजेच उच्च रक्तदाबामुळे होणारी डोकेदुखी, सायनायटीस, मेंदूतल्या रक्ताच्या गुठळ्या, मेंदूतील संसर्ग, दुखापत, मेंदूतल्या गाठी आणि एन्युरिझम अशी याची कारणं असू शकतात. कोलेस्टेरॉलपासून मुक्त करून हृदयाचे आरोग्य संभाळते व्हिटॅमिन डी, वाचा इतर फायदे डोकेदुखीसतत किंवा बराच काळ होत असेल, त्यासोबत ताप, थकवा, दृष्टी क्षीण होणं, दोन-दोन दिसणं, फेफरं भरणं, डोक्याला दुखापत झाल्यानंतर डोकं दुखणं असा त्रास होत असेल, तर त्यासाठी ताबडतोब उपचारांची गरज असते. मेंदूतल्या रक्तवाहिन्यांना सूज येऊन त्या मेंदूत फुटल्या तर असह्य वेदनादायी डोकेदुखीहोते व काही वेळेला ते जीवावरही बेतू शकतं.

वेदना शरीराच्या कोणत्याही भागात होणाऱ्या वेदना त्रासदायक असतात. मेंदूतल्या नसांमध्ये बिघाड झाला, तर मेंदूमध्ये वेदना होतात. स्पाँडिलिसीस, मल्टिपल स्क्लेरॉसिस, डिस्क डिसीज अशा विविध कारणांमुळे या वेदना होऊ शकतात. काही वेळेला फ्रायब्रोमायल्जिया विकारामुळे तीव्र वेदना होऊ शकतात. या विकारात झोप, स्मृती आणि मूडच्या समस्या निर्माण होतात, थकवा येतो मस्क्युलोस्केलेटल पेन्स निर्माण होतात. ही जुनाट डोकेदुखीआपल्याला दुर्बल करू शकते, त्यामुळे तिचं लवकर निदान व उपचार होणं महत्त्वाचं आहे. व्हर्टिगो व्हर्टिगो म्हणजे सतत गोल गोल फिरल्याची भावना. शरीराचा समतोल राखण्याच्या रचनेत बिघाड झाला,तर व्हर्टिगोची समस्या उद्भवते. पेरिफेरल व्हर्टिगो आणि सेंट्रल व्हर्टिगो असे याचे 2 प्रकार आहेत. पेरिफेरल व्हर्टिगो अचानक डोकं फिरवल्यानं उद्भवू शकतो. कमी कालावाधीसाठी ही चक्कर येते मात्र वारंवार येऊ शकते. कानातील टिनिटस किंवा ऐकण्याच्या समस्यांशी याचा संबंध असतो. तसंच उलट्यांशीही याचा संबंध असतो. सेंट्रल व्हर्टिगो मेंदूच्या समस्यांशी निगडित असतो. दीर्घकाळापर्यंत चक्कर येणं,शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणं, दृष्टी कमी होणं, शरीर सुन्न् होणं, क्रॅनियल नस अशक्त होणं यांच्याशी सेंट्रल व्हर्टिगोचा संबंध असतो. स्ट्रोकमुळेही कधीकधी सेंट्रल व्हर्टिगोचा त्रास सुरू होतो. म्हणून वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. फिट्स येणं मेंदूतील पेशींमध्ये अनियंत्रित विद्युत क्रियांचा स्फोट होऊन काही स्नायूंच्या हालचालींमध्ये समस्या येणं याला फिट्स येणं असं म्हणतात. काही आजारांवरील उपचार,ताप यामुळे फिट एखाद्यावेळी येऊ शकते किंवा अपस्मारासारख्या आजारात वारंवारही येऊ शकते. फिट्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. फोकल प्रकारात शरीराच्या एखाद्या भागात फिट येते, तर दुसऱ्या प्रकारात संपूर्ण शरीराला ही समस्या जाणवते. इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राम, मेंदूचा एमआरआय आणि इतर तपासण्या करून त्याचं गांभीर्य पाहता येतं व पुढील उपचार शक्य होतात. अर्धांगवायू/अशक्तपणा जोमानं काम करण्यासाठी संपूर्ण शरीराचं कार्य सुरळीत सुरू असणं गरजेचं असतं. कोणत्याही एका अवयवाला अशक्तपणा असेल, तर त्याचा खूप मोठा परीणाम होतो. चेहऱ्यावरच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा असेल, तर त्याला फेशियल पाल्सी म्हणतात. एक पाय अशक्त असेल, तर त्याला मोनोपरेसीस म्हणतात. शरीराचा अर्धा भाग कमजोर असेल, तर त्याला हेमिपरेसीस म्हणतात. दोन्ही पाय अशक्त असतील, तर त्याला पॅरापरेसीस असं म्हटलं जातं. मात्र अचानकच एखाद्या अवयवात अशक्तपणा जाणवल्यास ते स्ट्रोकचं लक्षणही असू शकतं. त्यासाठी तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. ट्युमर,एखादा आघात, एएलएस (Amyotrophic lateral sclerosis), poliomyelitis प्रमाणे एखादा संसर्ग, myositis सारखा आजार ही याची काही कारणं असू शकतात. कोलेस्टेरॉल सहज बाहेर काढेल भोपळ्याचा ज्युस, फक्त ‘या’वेळी पिणे आहे आवश्यक! विस्मृती वयस्कर लोकांमध्ये विस्मृतीची समस्या अनेकदा पाहायला मिळते. वृद्धत्वाकडे झुकताना काही प्रमाणात विस्मृती होणं स्वाभाविक असतं व सामान्यही असतं. हरवल्यासारखं वाटणं, आर्थिक व्यवस्थापनात समस्या येणं, दररोजची कामं करताना अडचणी येणं, गॅस चालूच राहणं, जवळच्या व्यक्तींची नावं विसरणं, बोलताना समस्या येणं ही स्मृतीभ्रंशाची लक्षणं असतात. स्मृतीभ्रंशाची समस्या हळूहळू वाढत जाते. योग्य वेळी न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करावेत. यावर सध्यातरी उपचार नसले, तरी लक्षणं आटोक्यात ठेवण्यासाठी काही औषधं व थेरपींचा वापर करता येऊ शकतो. मज्जासंस्थेच्या कामात बिघाड झाल्यास मेंदूशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्याची लक्षणं सामान्य डोकेदुखीपासून ते चक्कर, अर्धांगवायू इथपर्यंत कोणतीही असू शकतात. त्याकरता कोणताही लक्षणं वारंवार दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या