JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Women Health : स्तनातून पुरेसं दूध येत नाहीये? हा पदार्थ प्या आणि चमत्कार पाहा

Women Health : स्तनातून पुरेसं दूध येत नाहीये? हा पदार्थ प्या आणि चमत्कार पाहा

खजूरापासून बनवलेला चहा हा आरोग्यदायी आहे. हा चहा शरीरातील अनेक घटकांची कमी पूर्ण करतो आणि शरीर सुदृढ ठेवतो.

जाहिरात

स्तनातून पुरेसं दूध येत नाहीये? हा पदार्थ प्या आणि चमत्कार पाहा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

साधारण चहाचे सेवन आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, पण काही गोष्टींपासून बनवलेला चहा हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. खजूरापासून बनवलेला चहा हा आरोग्यदायी आहे. हा चहा शरीरातील अनेक घटकांची कमी पूर्ण करतो आणि शरीर सुदृढ ठेवतो. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या लाल खजूरमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट आढळतात. तेव्हा खजूर चहा पिण्याने विविध फायदे जाणून घेऊयात. प्रतिकारशक्ती वाढवा : लाल खजूर आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यात अनेक अँटी-ऑक्सिडंट आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. खजुरापासून बनवलेला चहा शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करतो. जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान अशक्तपणा जाणवत असेल तर हा चहा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. प्रजनन क्षमता वाढवते : लाल खजूर महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, लाल खजुरापासून बनवलेल्या चहाचे नियमित सेवन केल्यास तुमचे गर्भाशय उबदार राहते आणि प्रजनन क्षमता वाढते. तसेच हा चहा पांढर्‍या रक्त पेशी वाढवण्यासाठी देखील प्रभावी मानला जातो, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास आणि यकृताचे संरक्षण करण्यात मदत होते.

ब्रेस्ट फिडींग : लाल खजुरामध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह सारखी खनिजे आणि जीवनसत्वे आढळतात. हे पोषक घटक स्तनपानाला चालना देण्यासाठी मदत करतात. तसेच यामुळे दूध वाढण्यास देखील मदत होते. ताणतणावापासून मुक्ती : लाल खजुरापासून बनवलेला चहा देखील तणाव कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. खजुराच्या चहाचे नियमित सेवन केल्याने मध्यवर्ती मज्जासंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. चाळीशीतही चेहऱ्यावर हवाय विशी सारखा ग्लो? मग आहारात आजच सामील करा हे 5 पदार्थ निद्रानाशापासून आराम : लाल खजुरापासून बनवलेला चहाही निद्रानाश दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. हा चहा प्यायल्याने झोपेची समस्या दूर होते आणि आरोग्याला देखील फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या