JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जुना कुलर देईल महाबळेश्वरसारखी थंडी; आजच करा हे छोटे बदल, AC देखील होईल फेल!

जुना कुलर देईल महाबळेश्वरसारखी थंडी; आजच करा हे छोटे बदल, AC देखील होईल फेल!

काही छोटेसे बदल केले तर नवीन कुलर विकत घेण्याची वेळच येणार नाही

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 मे : कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान इतकं वाढलंय की उकाड्याने लोक त्रासले आहेत. या कडक उन्हापासून व उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एसी किंवा कूलर हे दोनच पर्याय आहेत. एसी खूप महाग असतात, त्यामुळे कूलर हे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये असतात. पण कूलर जुना झाला असेल तर तो जास्त थंड हवा फेकत नाही. त्यामुळे उकाड्यापासून बचावासाठी त्याची मदत होत नाही. जुन्या कूलरमध्ये कालांतराने काही पार्ट्स खराब होतात किंवा कचरा अडकतो, त्यामुळेही तो कमी थंड हवा देतो. अशा परिस्थितीत नवीन कूलर घ्यावा लागू शकतो. पण नव्या कूलरसाठी खर्च करण्याआधी तुम्ही जुन्या कूलरमध्ये काही बदल करून त्याला नवीन बनवू शकता. यामुळे तुमचा जुना कूलर अगदी नव्याप्रमाणे थंड हवा देईल व तुमचा खर्चही वाचेल. जुन्या कूलरमध्ये काय बदल करायला पाहिजेत, ते जाणून घेऊयात. कूलर पूर्णपणे स्वच्छ करा: कूलरमधील सर्व धूळ आणि घाण काढून तो स्वच्छ करा. यासाठी कूलरच्या बाहेरील आणि आतील भाग कोमट पाण्याने आणि साबणाने धुवा किंवा स्वच्छ करा. शक्य असल्यास कूलरचे पार्ट्स वेगळे करून स्वच्छ करा आणि नंतर पुन्हा जोडून घ्या. तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे गेल्यावर शरीरात होतात हे 5 बदल?   चांगल्या कामगिरीसाठी कूलर पॅड बदला: कूलर पॅडची कार्यक्षमता कालांतराने कमी होत जाते. त्यामुळे नवीन पॅड खरेदी करा आणि जुन्या पॅडच्या जागी ते लावा. चांगल्या दर्जाचे पॅड निवडा जे पाणी चांगले शोषण्यास आणि हवा थंड करण्यास मदत करतात. पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करा आणि पाणी नियमितपणे बदला: कूलरमध्ये नेहमी पुरेसं पाणी असेल, याची काळजी घ्या. पाण्याची पातळी नियमितपणे तपासा आणि आवश्यक असल्यास त्यात पाणी टाकत राहा. कूलरमध्ये जास्त पाणी ठेवल्याने पाण्याचा थंडावा वाढतो आणि कूलरची कार्यक्षमता सुधारते. या शिवाय ठराविक अंतराने कूलरमधील पाणी बदला, जेणेकरून कूलर आपोआप नीट काम करत राहील व तुम्हाला थंड हवा देत राहील. कूलर हवा थंड करत नसेल तर लगेच नवीन न घेता, त्यात थोडे बदल करून पाहायला हवेत. तुम्हाला त्याबद्दल फार माहिती नसेल तर तुम्ही कूलर दुरुस्त करणाऱ्यालाही बोलवू शकता. असं केल्यास कमी खर्चात तुमचा कूलर दुरुस्त होईल व नवीन घेण्याचा खर्च वाचेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या