मिथुन गमेती
निशा राठौड, प्रतिनिधी उदयपूर, 20 जून : योगासने प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची आहे. जीवनशैली सुधारण्यासाठी आणि अनेक समस्या आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी योग प्रभावी आहे. गंभीर ते गंभीर आजारांमध्येही योग केल्याने खूप चांगले परिणाम दिसून आले आहेत. असे अनेक लोक आहेत जे आयुष्यात पराभूत झाले, निराश झाले, पण त्यांना योगाच्या माध्यमातून नवजीवन मिळाले आहे. आज अशाच एका व्यक्तीच्या धैर्यवान प्रवासाबाबत जाणून घेऊयात. मिथुन गमेती असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा 2021 मध्ये रस्ता अपघात झाला होता. त्यानंतर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते कोमात गेले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी योगासने सुरूच ठेवली. आता ते योग प्रशिक्षक आहे आणि योगशास्त्रात B.Sc करत आहे.
मिथुन यांनी सांगितले की, 2021 मध्ये घरातून ऑफिसला जात असताना त्यांचा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या दरम्यान ते जवळपास 1 महिना कोमात होते. कोमातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या शरीराचे अनेक भाग नीट काम करत नव्हते. अनेक डॉक्टरांच्या भेटीनंतर त्यांना योगा करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर सुमारे 1 महिना योगासन केले. यावेळी त्यांच्या शरीरात बदल दिसून आला. यानंतर त्यांनी योगाबाबत माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली. नवीन जीवन मिळाल्यानंतर मिथुन गमेती यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगासनासाठी समर्पित केले. आता ते योग प्रशिक्षक आहे आणि योगशास्त्रात B.Sc करत आहे. हठयोगात विश्वविक्रम - मिथुनने सांगितले की, “पश्चिमोत्तानासन” योग आसन अर्धा तास धारण करून हठयोगातील जागतिक विक्रमात आपले नाव नोंदवले आहे आणि सुवर्णपदक जिंकून उदयपूर शहराचे नाव जगासमोर आणले आहे. ते म्हणतात की, योग हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. त्याचे ते स्वतः जिवंत उदाहरण आहेत.