JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Valentine's Week: पार्टनरला खूश करण्यासाठी देऊ शकता ही 5 स्पेशल गिफ्ट्स

Valentine's Week: पार्टनरला खूश करण्यासाठी देऊ शकता ही 5 स्पेशल गिफ्ट्स

या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही नेहमीचेच गिफ्ट न देता तुमच्या जोडीदाराचं भवितव्य सुधारण्यासाठी चांगलं गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट त्यांना भविष्यात जपता येईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 08 फेब्रुवारी : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. सात फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन विक (Valentine’s Week) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या खास दिवशी लोक आपलं प्रेम (Love) दर्शवण्यासाठी आणि प्रेम साजरं करण्यासाठी खास सेलिब्रेशन करतात. या दिवशी लोक आपल्या पार्टनरला गिफ्ट (Gift) देण्याचा विचार करत असतात. व्हॅलेंटाईन डेला आपल्या पार्टनरला काहीतरी खास गिफ्ट द्यावं, यासाठी लोक वेगवेगळ्या कल्पना वापरतात. अनेक जण सरप्राईज देतात. कपडे, दागिने अशा भेटवस्तू सर्वमान्य आहेत. पण या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही नेहमीचेच गिफ्ट न देता तुमच्या जोडीदाराचं भवितव्य सुधारण्यासाठी चांगलं गिफ्ट देऊ शकता. हे गिफ्ट त्यांना भविष्यात जपता येईल.

Valentine Week : ..तर आज ‘ते’ सोबत असते! सलमान-ऐश्वर्याची अधुरी ‘प्रेमकहाणी’

1. तुमच्या आर्थिक स्थितीची एकत्र चर्चा करा: तुम्ही तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डेसाठी रोमँटिक डिनरसाठी (Romantic Dinner) घेऊन जाता, तेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल, भविष्यकाळातील तुमची उद्दिष्टे आणि प्लॅन (Plan) यावर चर्चा करण्याची संधी म्हणून वापरू शकता. तुमच्या पार्टनरसोबत इनव्हेस्टमेंटचा प्लॅन (Investment Plan) बनवा आणि पुढचे काही दिवस एकमेकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल समजून घेण्यासाठी एकमेकांच्या सेव्हिंग्सबद्दल चर्चा करा. तुम्ही एकमेकांचे आर्थिक भागीदार होऊ शकता आणि जबाबदाऱ्याही तितक्याच शेअर करू शकता. 2. त्यांच्या भविष्यात गुंतवणूक करा: तुमच्या जोडीदाराला एखादा महागडा दागिना किंवा आय-फोन देण्याऐवजी, त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी (education) किंवा त्यांच्याकडे असणारी इतर उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरता येतील अशी रोख रक्कम भेट द्या. ही रक्कम जास्त नसली तरी ती त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल. 3. लाइफ इन्शुरन्स खरेदी करा: तुम्ही या व्हॅलेंटाईन डेला लाइफ इन्शुरन्समध्ये (Life insurance) देखील गुंतवणूक करू शकता. कोरोनाच्या आजाराने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे लाइफ इन्शुरन्स हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेला स्वतःसाठी लाइफ इन्शुरन्स खरेदी करून आणि तुमच्या पार्टनरला नॉमिनी बनवणं, योग्य ठरेल. यातून तुम्ही त्यांची काळजी घेत आहात आणि तुम्ही जवळपास नसताना त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हावं अशी तुमची इच्छा आहे, असा मेसेज पोहोचेल.

Propose Day विषयी हे माहित आहे का? कसं करावं प्रपोज? काय द्यावं गिफ्ट? करा क्लिक

4. प्रेम शेअर करण्यासाठी आहे: प्राइमरी मार्केट्समध्ये गेल्या काही काळापासून चांगले रिटर्न (return) मिळत आहेत. या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या नावाने काही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरला अधिक आनंदी करण्यासाठी आवडत असलेल्या ब्रँडचे शेअर्स (shares) खरेदी करू शकता. यातून तुमच्या एकत्र गुंतवणुकीच्या प्रवासाची सुंदर सुरुवात होईल. 5. क्रेडिटची भेट: तुम्ही तुमच्या नात्याबद्दल दृढ असाल तर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा अधिकृत यूजर म्हणून तुमच्या पार्टनरला जोडू शकतात. इथे तुम्ही फर्स्ट यूजर असाल आणि खात्याच्या प्राथमिक वापरकर्ता राहाल आणि खात्याच्या सर्व चार्जेससाठी जबाबदार असाल, शिवाय तुमचे पार्टनर तुमचं खातं वापरू शकतात. अशाप्रकारे, तुम्ही कपडे किंवा बाकी भेटवस्तू न घेता या नवीन पद्धती वापरू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या