Home /News /lifestyle /

Propose Day विषयी 'हे' माहित आहे का? कसं करावं प्रपोज? काय द्यावं गिफ्ट?

Propose Day विषयी 'हे' माहित आहे का? कसं करावं प्रपोज? काय द्यावं गिफ्ट?

Propose Day: आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलू शकाल.

    मुंबई, 7 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन वीक म्हणजेच प्रेमाचा आठवडा (Valentine Day) सुरू झाला आहे मित्रांनो. व्हॅलेंटाईन वीकमधील दुसरा दिवस प्रपोज डे (Propose Day) म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डेच्या दिवशी प्रेमी एकमेकांशी आपल्या हृदयातील गोष्टी बोलतात. हा दरवर्षी फक्त 8 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रपोज डे ला खूप महत्व आहे. या दिवशी लोक त्यांच्या मनातील भावना आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अनेकांना त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाही. यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स (Propose Day Tips) घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर मनमोकळेपणाने बोलू शकाल. प्रपोज डे का साजरा करतात? प्रपोज डे साजरा करण्यामागे कोणतीही ऐतिहासिक कथा नाही. वर्षानुवर्षे पाश्चिमात्य संस्कृतीत प्रपोज डे साजरा केला जात आहे. पण, आता जवळपास प्रत्येक देशात तो आधुनिक पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवणं खूप अवघड काम आहे. म्हणूनच लोक विशिष्ट दिवसाची वाट पाहत असतात. फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो आणि जेव्हा प्रेम सप्ताह सुरू होतो तेव्हा प्रेम व्यक्त करण्याचाही हा सर्वोत्तम काळ असतो. त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. असे करा प्रपोज तुमची मैत्रीण दररोज ज्या मार्गावरून जाते त्या मार्गावर तुम्ही तुमच्या हृदयातील गोष्टी कुठेतरी लिहून ठेऊ शकता. पण, हे लिहताना तिला तिला किंवा इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसोबत प्रवासात असाल तर तिथे घोषणा करून तुम्ही तुमच्या मनाची गोष्ट बोलू शकता. मैत्रिणींसोबत चित्रपट पाहण्याची योजना आखा आणि चित्रपटाच्या मध्यांतरात तुमचा व्हिडिओ प्ले होईल अशी व्यवस्था करा. ती खूप सरप्राईज होईल. काही अॅक्टिव्हिटी करत असतानाही तुम्ही तुमच्या मैत्रिणीला प्रपोज करू शकता. ते खूप संस्मरणीय होईल. तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी एका व्हिडिओमध्ये शेअर करून तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करू शकता. मैत्रिणीला लाँग ड्राईव्हवर घेऊन जा आणि मस्त रोमँटिक वातावरणात तिचा हात धरून तिला लग्नासाठी प्रपोज करा. Rose Day 2022 : आराम देण्यासोबतच गुलाब लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यासही करतो मदत भेटवस्तू काय द्यावी? खरंतर मनापासून दिलेली भेटवस्तू कोणीच नाकारत नाही. मात्र, जेव्हा प्रेम व्यक्त करण्याचा प्रसंग असेल तेव्हा भेटवस्तू देखील त्याच मूडनुसार दिली पाहिजे. यामुळेच प्रपोज डेच्या दिवशी काय गिफ्ट द्यायचे याचा विचार लोक आधीच करू लागतात. तुम्ही अजून ठरवले नसेल तर प्रपोज डे ला काय गिफ्ट द्यायचे तर आम्ही तुम्हाला सांगतो. नियॉन लव्ह लाइट ही अगदी नवीन भेट आहे. प्रपोज डे वर, तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला निऑन लव्ह लाइट भेट देऊ शकता. हे खास प्रेमींसाठी डिझाइन केलेले आहे ज्यामध्ये रोमँटिक आणि प्रेमळ शब्द लिहिले आहेत ज्यात मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या प्रियकर किंवा मैत्रिणीला नियॉन लव्ह लाइट नक्कीच आवडेल. नेकलेस या खास दिवशी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला प्रपोज करताना सुंदर सोन्याचा मुलामा असलेला पितळ आणि स्टर्लिंग सिल्व्हर नेक पीस देऊ शकता. मुलींना सहसा नेकलेस आवडतात आणि जेव्हा प्रपोज डे वर भेटवस्तू देण्याचा विचार येतो, तेव्हा हा एक सुंदर मार्ग असू शकतो. गुलाबाचा पुष्पगुच्छ लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे हे तुम्हाला माहीत असल्याने प्रपोज डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी लाल फुलांच्या गुलदस्त्यापेक्षा चांगली भेट असूच शकत नाही. शक्य असल्यास, तुमचे प्रेम व्यक्त करताना, तिला ताज्या गुलाबांचा पुष्पगुच्छ द्या किंवा कृत्रिम गुलाब बाजारात उपलब्ध आहेत, तुम्ही तिला प्रपोज डे गिफ्ट देऊ शकता. अंगठी ही अशी भेट आहे जी कधीही जुनी होत नाही आणि सहसा बहुतेक लोकांना अंगठी घालून प्रपोज करायला आवडते. प्रपोज डेच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारच्या आणि डिझाइन्सच्या अंगठ्या विकल्या जातात. तुम्ही तुमच्या आवडीची अंगठी खरेदी करू शकता आणि प्रपोज डेच्या दिवशी गिफ्ट करू शकता.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Valentine day, Valentine week

    पुढील बातम्या