यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी असतानाही त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येऊ शकलं नाही. कारण घोड्यांच्या गाड्यांचा वेगच तेवढा जबरदस्त होता.
कोल्हापूर, 16 मे : शर्यंत म्हटले की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे थरार… त्यामुळे शर्यतीत अनेक थरारक घटना पाहायला मिळतात. सध्या असाच घोडागाडी शर्यतीमधील (Horse racing) एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक गाड्यांखाली एक तरुण सापडला. या तरुणाच्या अंगावरून एकाच वेळी 3 ते 4 गाड्या गेल्या. सुदैवाने या घटनेतून तो थोडक्यात बचावला. ही घटना कोल्हापूरमध्ये (kolhapur) घडली आहे. कोल्हापूरमध्ये घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यंत अगदी सुरळीतपणे सुरू होती. मात्र अचानक एक गाडीवान घोडागाडीपुढे पळत होता. पळता पळता त्याचा तोल सुटल्याने तो थेट घोड्यांच्या टापाखाली आला आणि पाठीमागून येणाऱ्या अनेक गाड्या त्याच्या अंगावरुन सुसाट वेगाने धावून गेल्यात. एकापाठोपाठ तीन ते चार गाड्यांनी या तरुणाला तुटवून पुढे निघून गेल्या. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी असतानाही त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येऊ शकलं नाही. कारण घोड्यांच्या गाड्यांचा वेगच तेवढा जबरदस्त होता. त्यामुळे अनेक घोडागाड्या त्याच्या अंगावरून गेल्याचे या ठिकाणी दिसत आहे. ( आजीबाईंच्या एका एका उडीने वाढवली हृदयाची धडधड; वृद्धेचा जबरदस्त Skipping Video ) त्यामुळे शर्यतीचा आनंद लुटत असताना आपण नेहमी सतर्क राहिले पाहिजे. आपल्यासोबत कोणतीही दुर्घटना घडणार नाही. याची काळजी घेतली पाहिजे. अचानक झालेल्या या घटनेनंतर गाड्या थांबल्या आणि या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.