मुंबई, 16 मे : जसजसं वय वाढतं तसतशा अनेक शारीरिक तक्रारी उद्भवतात. एकदा का वयाची साठी पार केली की बहुतेकांना साध चालणंही शक्य होत नाही. चाललं की खतकवा लागतो. अशात धावणं, पळणं, उड्या मारणं तर दूरचचं. पण एका आजीबाईने मात्र अशा वयातही दोरीच्या उड्या मारल्या आहेत. तरुण-तरुणींनाही लाजवेल असा हा आजीचा व्हिडीओ आहे
(Grandmother skipping rope video).
दोरीउड्या तशा पाहायला सोप्या वाटत असल्या तरी त्यासाठी बराच स्टॅमिना लागतो.दोरीउड्यांची स्पर्धा तुम्ही कधी ना कधी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत लावलीच असेल. शाळेतही तुम्ही अशा स्पर्धत भाग घेतला असेल किंवा आता एक्सरसाइझ म्हणूनही तुम्ही दोरीउड्या मारत असाल. त्यावेळी किती घाम फुटतो हे तुम्हाला माहिती असेल. काही जण फक्त 10 उड्या मारूनही थकतात. काहींच्या पायात दोरी अडकते. पण या आजींनी मात्र इतक्या जबरदस्त दोरीउड्या मारल्या आहेत की तुम्ही विश्वास ठेवणार नाही.
हे वाचा - OMG! तरुणीने पाण्यात केला इतका जबरदस्त Stunt; पुन्हा पुन्हा पाहाल हा VIDEO
सुरुवातीला आजींच्या पायात दोरी अडकल्याची दिसते. पण तरी त्या हार मानत नाही. पुन्हा दोरी हातात घेतात आणि त्याच जोशाने दोरी उड्या मारू लागतात. एक, दोन, तीन, चार... अशा सलग न अडकता त्या नऊ उड्या त्या आरामात मारतात. त्यानंतर थांबतात. आजींना पाहिलं तर त्यांचं वय 80 पेक्षा जास्तच असावं असं दिसतं. पण या वयातही त्यांचा स्टॅमिना, जोश, जिद्द मात्र बरीच आहे.
hepgul5 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. वय हा फक्त एक आकडा आहे हे या आजींनी दाखवून दिलं आहे. सर्वजण या आजीवर फिदा झाले आहेत. आजीच्या फिटनेसचं सर्वजण कौतुक करत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.