पांडुरंग शामराव भोसले असं फिर्यादी व्यक्तीचं नाव असून ते फुलेवाडी येथील रहिवासी आहे. (फोटो- TOI)
कोल्हापूर, 03 नोव्हेंबर: कोल्हापुरातील एका तरुणाला तंबाखूची तलफ (tobacco cravings) चांगलीच महागात पडली आहे. तंबाखू मळण्यात गुंग झालेल्या या व्यक्तीला एका भामट्याने त्याला दीड लाखांचा चुना लावला (Theft 1.5 lakh) आहे. संबंधित व्यक्त हा माथाडी कामगार असून त्याने दिवाळीचा बोनस आणि पगाराची (Diwali bonus and salary) जमा झालेली एकूण दीड लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढली होती. दरम्यान, तंबाखू खाण्याची तलफ झाल्याने ते बँकेसमोरच बसले होते. यावेळी आलेल्या एका भामट्याने पिशवीत ठेवलेली दीड लाखांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पांडुरंग शामराव भोसले असं फिर्यादी व्यक्तीचं नाव असून ते फुलेवाडी येथील रहिवासी आहे. फिर्यादी भोसले हे माथाडी कामगार असून त्यांनी लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे शासकीय गोदामात माथाडी कामगार म्हणून काम करतात. मंगळवारी दुपारी भोसले हे बँकेत गेले होते. त्यांनी दिवाळीला मिळालेला बोनस आणि पगाराची जमा झालेली रक्कम अशी एकूण दीड लाख रुपयांची रोकड काढली होती. हेही वाचा- आई, पत्नीवर उपचार करू की मुलांना कपडे घेऊ, हवालदिल बसचालकानं केलं विष प्राशन बँकेबाहेर आल्यानंतर, फिर्यादी भोसले यांना तंबाखू खाण्याची तलफ झाली. यामुळे ते बँकेच्या बाहेर पायरीवर खाली बसले आणि दीड लाख रुपयांची रक्कम असलेली पिशवी बाजूलाच ठेवली. पायरीवर बसून तंबाखू चोळत असताना, एक तरुण त्याठिकाणी आला आणि त्याने तुमचे पैसे रस्तावर पडले असल्याची थाप मारली. भोसले यांनी पुढे सरकून पैसे पडल्याचं पाहत असतानाच, संबंधित तरुणाने रोकडची पिशवी घेऊन पळ काढला. हेही वाचा- आज कुछ तुफानी करते है! तरुणाने पेट्रोल पंपावर फेकला पेटलेला फटाका, भयावह VIDEO आरडाओरडा करेपर्यंत भामट्याने आपल्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली आहे. डोळ्यादेखत चोरी झाल्यानंतर, भोसले यांनी तातडीने लक्ष्मीपुरा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस अज्ञात भामट्यांचा शोध घेत आहेत.