मराठी बातम्या /बातम्या /nashik /

नाशिक: आई, पत्नीवर उपचार करू की मुलांना कपडे घेऊ, हवालदिल बसचालकानं केलं विष प्राशन

नाशिक: आई, पत्नीवर उपचार करू की मुलांना कपडे घेऊ, हवालदिल बसचालकानं केलं विष प्राशन

Crime in Nashik: नाशिक येथील कळवण आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन केलं (ST driver drink poison) आहे. त्यांना केवळ दोन हजार रुपये पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळी बोनस मिळाला होता.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 03 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. पाच दिवसांपूर्वी शेगाव आगारातील एका एसटीला लटकून एका कर्मचाऱ्याने आत्महत्या (ST Driver commits suicide) केली आहे. ही घटना ताजी असताना आता नाशिक येथील कळवण आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (ST driver drink poison) केला आहे. तुटपुंज्या पगारात आईवर आणि पत्नीवर उपचार कसे करायचे? आणि मुलांना दिवाळीत कपडे कसे घ्यायचे? या विवंचनेतून संबंधित कर्मचाऱ्याने विष प्राशन केलं आहे.

प्रमोद सूर्यवंशी असं विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. सूर्यवंशी यांचा रजेचा अर्ज वेळेत मंजूर न झाल्याने त्यांना दोन हजार रुपयांचा तुटपुंजा पगार आणि अडीच हजार रुपये दिवाळी बोनस असे केवळ साडेचार हजार रुपये मिळाले होते. या रकमेत आजारी आई आणि बायकोचे उपचार करू की मुलांना दिवाळीसाठी कपडे घेऊ, या विवंचनेत सूर्यवंशी सापडले होते. त्यामुळे हवालदिल झालेल्या प्रमोद सूर्यवंशी यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा-नाशिक: इंजिनिअर झालेल्या भावड्याने सुरू केला भलताच बिझनेस; कांड वाचून हादराल!

नातेवाईकांनी त्वरित सूर्यवंशी यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने, सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. सोमवारी रात्री कळवळमध्ये एकाने तर मंगळवारी दुपारी इगतपुरी आगारातील दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रशासनाला देखील घाम फुटला आहे.

हेही वाचा-आजी-मामीसोबतची मस्करी जीवावर बेतली, नागपुरात 12 वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

दुसरीकडे, एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीशी चर्चा केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं होतं. असं असूनही काही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते. त्यांनी संप सुरूच ठेवला होता. यामुळे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी इगतपुरी आगारातील दहा कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा आदेश बजावला. यामुळे संतप्त झालेल्या दोन कर्मचाऱ्यांनी गळफास घेत आत्महत्या करण्याचा तर एकाने रेल्वेकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिघांचे प्राण वाचले आहेत.

First published:

Tags: Crime news, Nashik