कोल्हापूर, 16 सप्टेंबर : कोल्हापुरात (Kolhapur) मंडलिक आणि मुश्रीफ गटाच्या आघाडीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. कोल्हापुरातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीत (Kasaba Sangaon Gram Panchayat) मंडलिक आणि मुश्रीफ गटाची आघाडी आहे. मात्र, आता या ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी (Gram Panchayat 7 members resign) आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आघाडीत फूट पडली आहे. या राजीनामा नाट्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच परिस्थिती पाहता गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणअयात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव या ग्रामपंचायतीमध्ये खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या गटाने एकत्र येत आघाडी करुन ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं. चार वर्षांपासून या आघाडीची ग्रामपंचायतीवर सत्ता आहे. मात्र, आज ग्रामपंचायतीमधील सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. कर लावण्याच्या संदर्भात केंद्राने राज्यांच्या अधिकारांवर गदा आणू नये - अजित पवार कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कसबा सांगाव आहे. या ठिकाणी मंडलिक आणि मुश्रीफ गटाची एकत्रित सत्ता आहे. सरपंच रणजित कांबळे सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत या सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. एकूण सात सदस्यांनी अचानक राजीनामे दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती लक्षात घेता गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रंजना माळी, विरश्री जाधव, उपसरपंच विक्रमसिंह जाधव, दीपक हेगडे, सारिका मगदूम, पद्मावती जाधव, राहुल हेरवाडे या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती समोर येत आहे.