JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर / प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा! गर्लफ्रेंडच्या वडिलांनी तलवारीचा धाक दाखवल्याने तरुणाची आत्महत्या

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा! गर्लफ्रेंडच्या वडिलांनी तलवारीचा धाक दाखवल्याने तरुणाची आत्महत्या

Suicide in Kolhapur: प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकानं जीवे मारण्याची धमकी दिल्यानं एका युवकानं घाबरून टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानं विष प्राशन करून स्वतःला संपवलं आहे.

जाहिरात

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोल्हापूर, 25 मे: कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील फराकटेवाडी या गावात एका युवकानं विष प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकानं जीवे मारण्याची धमकी दिल्यानं संबंधित युवकानं घाबरून टोकाचं पाऊल उचललं आहे. अभिजित फराकटे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीच्या वडिलांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास मुरगुड पोलीस करत आहेत. आत्महत्या केलेल्या युवकाचं गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण संबंधित मुलीच्या वडिलांना लागली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर प्रेयसीच्या वडिलांनी थेट अभिजितच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली. प्रकरण एवढ्यावरचं थांबवलं नाही, तर तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकीही दिली. प्रेयसीच्या वडिलांच्या धमकीला घाबरलेल्या अभिजितनं घरातील विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. हे वाचा- आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं; परिस्थितीपुढे हतबल तरुणानं उचललं टोकाचं पाऊल आपल्या मुलानं विष प्राशन केल्याचं समजताच, अभिजितच्या आई वडिलांनी त्याला तातडीनं कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असतानाचं अचानक त्याची प्रकृती खालावल्यानं त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीच्या वडिलांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या