• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं; परिस्थितीपुढे हतबल तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं; परिस्थितीपुढे हतबल तरुणानं उचललं टोकाचं पाऊल

कोरोना विषाणूनं (Corona Virus) भारतात शिरकाव केल्यापासून देशात सातत्यानं लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं जात आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय (Business) ठप्प झाले आहेत.

 • Share this:
  आष्टी, 24 मे: कोरोना विषाणूनं (Corona Virus) भारतात शिरकाव केल्यापासून देशात सातत्यानं लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केलं जात आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय (Business) ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची परिस्थिती तर याहूनही बिकट आहे. डोक्यावर कर्जाचं ओझं (Loan) आणि हाताला रोजगार (Unemployment) नाही. अशा दुहेरी संकटाच्या कात्रीत सापडलेल्या अनेकांनी आपलं जीवन संपवलं (Suicide) आहे. अशीच एक घटना परतूर तालुक्यातील आष्टी याठिकाणी घडली आहे. येथील एका तरुणानं आई वडिलांवर पीक कर्जाचं ओझं (burden of crop debt) आणि सततचा लॉकडाऊनला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संबंधित 25 वर्षीय मृत तरुणाचं नाव योगेश साहू तिखे असून त्यानं 22 मे रोजी रात्री एकच्या सुमारास घराजवळील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आई वडिलांवर कर्जाचं ओझं, हाताला रोजगार नाही, सततच्या लॉकडाऊनमुळे अन्य काही करता येत नाही, अशा अनेक अडचणींनी घेरलेल्या या तरुणानं अखेर टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा-पुण्यातील निर्घृण हत्येचं गूढ उलगडलं, रक्ताच्या थारोळ्यात आढळली होती महिला अवघ्या 25 व्या वर्षी कर्त्या मुलानं आत्महत्या केल्यानं तिखे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत योगेशच्या आत्महत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. यानंतर त्यांनी मृतदेह आष्टी येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. यानंतर रात्री उशीरा योगेशवर आष्टी याठिकाणी अंत्यसंस्कार केले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: