मुंबई 3 एप्रिल**:** बहुप्रतिक्षित झी मराठी पुरस्कार सोहळ्याचा (Zee Marathi Awards) पूर्वार्ध नुकताच पार पडला. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आणि कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कारानं देऊन गौरवण्यात आलं. वरकरणी हा पुरस्कार सोहळा इतर इतर सोहळ्यांप्रमाणेच सामान्य वाटत असला, तरी यामध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. हा पुरस्कार होता ‘सर्वोत्कृष्ट सुने’चा. यंदाच्या वर्षी शुभ्रा (shubhra) या व्यक्तिरेखेनं या पुरस्कारावर नाव कोरलं. खरं तर हा पुरस्कार अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) हिला घोषित केला गेला. परंतु हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवी शुभ्रा अर्थात अभिनेत्री उमा पेंढारकर (Uma Pendharkar) मंचावर गेली होती. त्यामुळं सध्या एकच गोंधळ माजला आहे, पुरस्कार नक्की मिळाला कोणाला नव्या शुभ्राला की जुन्या शुभ्राला? सर्वोत्कृष्ट सुनेचा पुरस्कार अभिनेत्री तेजश्री प्रधान हिलाच मिळाला आहे. अग्गबाई सासुबाई या मालिकेत केलेल्या अभिनयासाठी तिला हा पुरस्कार मिळाला. या मालिकेचा दुसरा सीझन सध्या सुरु आहे. अन् या सीझनचं नाव अग्गबाई सुनबाई असं आहे. या मालिकेत अभिनेत्री उमा पेंढारकर शुभ्रा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्यामुळं अनेकांचा गोंधळ झाला. मात्र दोघांच्या व्यक्तीरेखांची नाव जरी सारखी असली तरी हा पुरस्कार अग्गबाई सासुबाई या मालिकेतील शुभ्राला म्हणजेच तेजश्रीला मिळाला आहे. अवश्य पाहा - ड्रग्ज प्रकरणात आणखी एका अभिनेत्याचं नाव आलं समोर; छापा टाकण्यापूर्वीच झाला फरार तेजश्री प्रधान वाढत्या कोरोनामुळं या सोहळ्यात अनुपस्थित होती. त्यामुळं तिच्या वतीनं उमानं ह पुरस्कार मंचावर जाऊन स्विकारला. अर्थात दोघांच्या व्यक्तीरेखांची नाव सारखीच आहेत त्यामुळं उमाला हा सन्मान दिला गेला. उमानं इंस्टास्टोरीमध्ये या पुरस्कारासंदर्भात बोलताना लिहिलं की, “काल तेजश्री प्रधान ताईच्या वतंने हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला होता. तुला मनापासून शुभेच्छा. तुझ्या इतक्याच ऊर्जेने ते पात्र साकारायला मी उत्सुक आहे.”