मुंबई 3 एप्रिल**:** प्रसिद्ध टीव्ही अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) याला ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपाखाली NCBनं ताब्यात घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी शादाब बटाटा नामक एका ड्रग्ज पेडलरला अटक करण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यानं एजाजचं नाव घेतलं. त्यामुळं सध्या त्याची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आता एजाजनं देखील दोन टीव्ही कलाकारांचं नाव घेतलं आहे. हे कलाकार मुंबईतील लोखंडवाला परिसरात राहतात. NCBनं त्यांच्याही घरावर छापा टाकला होता. परंतु अधिकारी घरी पोहोचण्यापूर्वीच ते घरातून फारर झाल्याची माहिती समोर आली आहे. एजाजनं एक अभिनेता आणि अभिनेत्रीचं नाव घेतलं आहे. दोघांकडेही विदेशी नागरिकत्व आहे. ते लोखंडवाला येथे राहत होते. दरम्यान एजाजनं माहिती देताच अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर धाड टाकली. मात्र NCB घरी पोहोचण्यापूर्वीच ते फारार झाले होते. सध्या पोलिसांद्वारे या कलाकारांचा शोध सुरु आहे. शिवाय हे कलाकार ज्या सेलिब्रिटींच्या संपर्कात होते त्यांची देखील आता चौकशी केली जाणार आहे. अवश्य पाहा - ‘Shweta Tiwari मला दांड्यानं मारायची’; पतीनं केला गंभीर आरोप Bigg Boss च्या सातव्या सीजनमध्ये एजाज खान प्रेक्षकांना दिसला होता. तिथे देखील एजाजची इतर स्पर्धकांसोबत वादावादी हा नेहमीचा विषय ठरला होता. त्यासोबतच चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील एजाजने भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे बॉलिवुडसोबतच छोट्या पडद्यावर देखील एजाजनं चांगलंच बस्तान बसवलं आहे. मात्र, आता ड्रग्ज प्रकरणात एजाज अडकण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.