JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मी असा व्यायाम करते अन् तुम्ही…’; पाहा झरिननं तयार केलं Don't Rushचं नवं वर्जन

‘मी असा व्यायाम करते अन् तुम्ही…’; पाहा झरिननं तयार केलं Don't Rushचं नवं वर्जन

या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना फिटनेसचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं डोन्ट रशचं (Don’t Rush) एक वर्जन तयार केलं आहे.

जाहिरात

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी वर्काउट नंतर काही गोष्टी खाणं टाळायला हवं.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 एप्रिल: झरिन खान (Zareen khan) ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी ती चक्क व्यायाम करताना शूट केलेल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आहे. तिनं या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना फिटनेसचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तिनं डोन्ट रशचं (Don’t Rush) एक वर्जन तयार केलं आहे. व्यायामाचा हा नवा प्रकार पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. झरिन खानला बॉलिवूडमधील फिटनेट फ्रिक असंही म्हणतात. ती स्वत:ला फिट अँड फाईन ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करते. शिवाय सोशल मीडियाव्दारे इतरांनाही व्यायामाचं महत्व समजावून सांगते. नुकतंच तिनं व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती डोन्ट रश मारताना दिसत आहे. हा पाहा डोन्ट रशचा माझा वर्जन, तुम्ही कसं मारता? अशा आशयाची कॉमेंट तिनं या व्हिडीओवर केली आहे. तिच्या या व्हिडीओवर काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अवश्य पाहा - चित्रपटांसाठी तिनं कॅन्सरलाही हरवलं; पाहा ध्येयवेड्या लीजाचा थक्क करणारा प्रवास

संबंधित बातम्या

झरिन खाननं सलमान खानच्या वीर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी तिचं वजन जास्त होतं. त्यामुळं तिला स्वस्तातली कतरिना कैफ म्हणून चिडवलं जायचं. परंतु नंतरच्या काळात तिनं योग्य आहार आणि व्यायाम करुन वजन कमी केलं. अक्सर या चित्रपटातील तिचा ग्लॅमरस लूक पाहून सर्वच जण चकित झाले होते. आता ती बॉलिवूडसोबतच तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये देखील काम करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या