मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /चित्रपटांसाठी तिनं कॅन्सरलाही हरवलं; पाहा ध्येयवेड्या लीजाचा थक्क करणारा प्रवास

चित्रपटांसाठी तिनं कॅन्सरलाही हरवलं; पाहा ध्येयवेड्या लीजाचा थक्क करणारा प्रवास

अक्षरश: मरणाच्या दारातून ती परत आली आहे. अन् या काळात केवळ चित्रपटात काम करण्याच्या इच्छेनं तिला लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया स्वप्नसुंदरीचा थक्क करणारा प्रवास..

अक्षरश: मरणाच्या दारातून ती परत आली आहे. अन् या काळात केवळ चित्रपटात काम करण्याच्या इच्छेनं तिला लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया स्वप्नसुंदरीचा थक्क करणारा प्रवास..

अक्षरश: मरणाच्या दारातून ती परत आली आहे. अन् या काळात केवळ चित्रपटात काम करण्याच्या इच्छेनं तिला लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया स्वप्नसुंदरीचा थक्क करणारा प्रवास..

मुंबई 4 एप्रिल: लीजा रे (Lisa Ray) ही भारतातील एक प्रसिद्ध मॉडेल आणि आभिनेत्री आहे. आज लीजाचा वाढदिवस आहे. 49व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जगभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (Happy Birthday Lisa Ray) आज तिनं बॉलिवूड, हॉलिवूड आणि मॉडलिंग या तिन्ही क्षेत्रात स्वत:चं असं एक स्थान निर्माण केलं आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाट्टेल एक काळ असाही होता जेव्हा तिनं चक्क कर्करोगाशी झुंज दिली आहे. (cancer diagnosis) अक्षरश: मरणाच्या दारातून ती परत आली आहे. अन् या काळात केवळ चित्रपटात काम करण्याच्या इच्छेनं तिला लढण्याची प्रेरणा दिली. पाहूया स्वप्नसुंदरीचा थक्क करणारा प्रवास..

सीसाचा जन्म 4 एप्रिल 1972 साली कॅनडामधील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. तिला लहानपणापासूनच मॉडलिंगची आवड होती. वयाच्या 16 वर्षी तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली. याच दरम्यान तिचं सौंदर्य पाहून चित्रपटात काम करण्याच्या ऑफर तिला मिळू लागल्या. मॉडलिंगसोबतच तिला अभिनयाचीही आवड होती अन् त्यामुळं तिनं सिनेमाक्षेत्रातही काम सुरु केलं. लीजाच्या आयुष्यात सर्वकाही स्वप्नवत चाललं होतं. परंतु याच दरम्यान तिला मल्टिपल माइलोमा नावाचा एक दुर्मिळ कर्करोग झाला.

अवश्य पाहा - ‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ

कर्करोग या शब्दानंच तिच्या आयुष्यात भूकंप झाला. त्यानंतर ती काही काळ नैराश्येत होती. पण याच काळात तिच्या स्वप्नांनी तिला जगण्याची प्रेरणा दिली. तिला जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्हायचं आहे. अन् यासाठी जिवंत राहाणं गरजेचं आहे. त्यामुळं मग तिनं योग्य ते उपचार घेण्यास सुरुवात केली. तिनं स्टेम सेल ट्रांसप्लांट शस्त्रक्रिया करुन कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. ती म्हणते जर झपाटून टाकणारं स्वप्न तिच्याकडे नसतं तर कर्करोगानं नक्कीच तिचा जीव घेतला असता. पण तिच्याकडे जगण्यासाठी कारण होतं त्यामुळंच आज आपला 49 वा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे. तिनं आजवर ‘द वर्ल्ड अनसीन’, ‘कसूर’, ‘आय कान्ट थिंक स्ट्रेट’, ‘विरप्पन’, ‘वॉटर’, ‘डिफेंडर’, ‘ट्रेडर्स गेम’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Cancer, Entertainment