मुंबई 15 मार्च**:** हनी सिंग (Yo Yo Honey Singh) हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोपकप्रिय रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याचा आज वाढदिवस आहे. 37 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हनी सिंगचं खरं नाव हिरदेश सिंग असं आहे. 1983 साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल आज यशाच्या शिखरावर असलेला हनी सिंग करिअरच्या सुरुवातीस चक्क एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत होता. हनीला लहानपणापासूनच गाण्याची प्रचंड आवड होती. शालेय स्पर्धा व सार्वजनिक सास्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणी गाऊन तो आपली ही आवड पुर्ण करत होता. शिक्षण पुर्ण होताच गायक म्हणून काम मिळवण्यासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्याला भांगडा प्रोड्युसर म्हणून काम मिळालं होतं. या कामासाठी त्याला केवळ 2 हजार रुपये पगार मिळत होता. त्यामुळं तो अनेकदा ऑफिसमध्येच झोपायचा आणि रस्त्यावर मिळणारं अन्न खावून दिवस काढायचा. पुढे हळूहळू त्यानं पैसे जमा केले व मुंबईतील वांद्रे येथे एक फ्लॅट भाड्यानं मिळवलं. या ठिकाणी तो आपल्या आणखी दोन मित्रांसोबत राहयचा. त्यांच्या मदतीनं त्यानं काही गाणी रेकॉर्ड केली अन् ती गाणी घेऊन तो म्युझिक कंपन्यांकडे जायचा. अवश्य पाहा - ‘कोरोनाचे नियम मोडाल तर याद राखा’; BMCनं अभिनेत्रीला शिकवला धडा 2005 साली त्यानं पेशी या म्युझिक अल्बमची निर्मिती केली होती. हा अल्बम थंडर या म्युझिक कंपनीला आवडला. अन् त्यांनी या अल्बमच्या ब्रॉडकास्टिंगची जबाबदारी स्विकारली. हा अल्बम सुपरहिट झाला. परिणामी हनी सिंगला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यानं ‘हाय मेरा दिल’, ‘ब्राउन रंग’, ‘हाई हील्स’, ‘ब्रेकअप पार्टी’, ‘ब्रिंग मी बॅक’, ‘ब्लू आईज’, ‘इसे कहते हैं हिप हॉप हिप हॉप’, ‘देसी कलाकार’, ‘रानी तू मैं राजा’, ‘पार्टी ऑन माई माइंड’, ‘पंजाबियां दी बैटरी’, ‘लुंगी डांस’, ‘बॉस टाइटल ट्रेक’, ‘पार्टी ऑल नाईट’, ‘सनी सनी’, ‘चार बोतल वोडका’, ‘पार्टी विद भूतनाथ’, ‘अता माझी सटकली’, ‘बर्थडे बॅश’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती केली. थोडक्यात काय तर एका अल्बममुळं हनी सिंग रातोरात सुपरस्टार झाला.