मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. पण, या तपासात गेल्या चार महिन्यानंतर एक नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. दिल्लीच्या प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलने आता मुंबई पालिकेच्या रुग्णालयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पण, त्यावेळी यूरीन नुमने घेतले नसल्याचे समोर आहे. जर सूशांतचे यूरीन नमुने घेतले असते तर आत्महत्येआधी त्याने ड्रग्स घेतले असते तर समोर आले असते. त्याच्या यूरीन नुमन्यामुळे जर त्याने खरच ड्रग्स घेतले असेल तर त्याचे किती प्रमाण होते, हे स्पष्ट झाले असते. त्यामुळे यूरीन नमुन्यावर AIIMS ने प्रश्न उपस्थितीत केले आहे. परंतु, आत्महत्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळा यूरीन नमुने हे घेतले जात नाही, असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अंमली विरोधी पथकाने जप्त केले 45 फोन दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्स घेत असल्याचा खुलासा झाला. त्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर अंमली विरोधी पथकाने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली आहे. अमली विरोधी पथकाने आतापर्यंत 45 फोन ताब्यात घेतले आहे. या फोनची तपासणी सध्या सुरू आहे. या फोन्समुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांची मोठी यादी समोर येण्याची शक्यता आहे. 45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळाला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे. उर्वरीत 30 मोबाइल फोनची तपासणी सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सारा अली खान, श्रद्धा, दीपिका, करिश्मा,जया शहा यांच्या मोबाइलचे रिपोर्ट हे महत्त्वाचे ठरणार आहे.