JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Mumbai Saga: कोण होता डीके राव? जॉन साकारतोय दाऊदला आव्हान देणाऱ्या डॉनची भूमिका

Mumbai Saga: कोण होता डीके राव? जॉन साकारतोय दाऊदला आव्हान देणाऱ्या डॉनची भूमिका

ट्रेलरमध्ये जॉन चक्क अंडरवल्ड डॉन अमर्त्य रावच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो तीन वेळा पोलीस एन्काउंटरमधून वाचलेल्या अमर्त्यची भूमिका साकारणार आहे. परंतु हा अमर्त्य होता तरी कोण?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 27 फेब्रुवारी : अभिनेता जॉन अब्राहम हा आपल्या अॅक्शन चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. असाच एक फुलपॅक अॅक्शन सीननं भरलेला एक नवा चित्रपट घेऊन जॉन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘मुंबई सागा’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. अन् ट्रेलरमध्ये जॉन चक्क अंडरवल्ड डॉन अमर्त्य रावच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटात तो तीन वेळा पोलीस एन्काउंटरमधून वाचलेल्या अमर्त्यची भूमिका साकारणार आहे. परंतु हा अमर्त्य होता तरी कोण? अमर्त्यला गुन्हेगारी विश्वात डीके राव या नावानंही ओळखलं जातं. मुंबईतील माटुंगा परिसरात एका गरीब कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. ८० च्या दशकात मुंबईतील गुन्हेगारीचं कमालीचं वाढलं होतं. बेरोजगारी, गरीबी, संप यांमुळं तरुण वर्ग गुन्हेगारीच्या दिशेने जात होता. अन् याच काळात अमर्त्यदेखील गुन्हेगार झाला. तो छोटा राजनच्या टोळीसाठी काम करायचा. हफ्ता वसूल करणं, बँक लूटणं, धमक्या देणं, हत्या करणं यांसारख्या आरोपांखाली त्यानं अनेकदा तुरुंगाची हवा खाल्ली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल तीन वेळा पोलीसांच्या हाती एन्काउंटर होताना तो वाचला आहे. अशा या नामांकित गुंडावर मुंबई सागा नावाचा एक चित्रपट येत आहे. अन् यामध्ये जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारणार आहे.

तो सल्ला अन् अभिनेत्री बॉलिवूडमधून गायब; शाहरुखमुळं संपलं अम्रिताचं करिअर पोलीस असो वा राजकारणी कुणालाही न घाबरता आपल्या भूमिकेवर ठाम असणारा अमर्त्य राव अखेर राजकारण्यांच्या जाळ्यात कसा अडकला जातो? तो गुन्हेगारी विश्वाकडे कसा वळतो? आणि चोर पोलिसाच्या खेळात नेमकं कोण जिंकतं? हे या चित्रपटात दाखवलं जाणार आहे. हा चित्रपट येत्या 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. संजय गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या