अम्रिता राव ही बॉलिवूडमधील एक आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
2/ 10
तिनं आपल्या 20 वर्षांच्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
3/ 10
परंतु अष्टपैलू अभिनेत्री असतानाही तिनं शाहरुखचा एक सल्ला ऐकला अन् तिच्या करिअरला उतरती कळा लागली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
4/ 10
मिस मालीनीला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं शाहरुखसोबत घडलेला तो किस्सा सांगितला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
5/ 10
‘मै हू ना’ या चित्रपटात तिनं शाहरुखसोबत काम केलं. ती शाहरुखची प्रचंड मोठी चाहती आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
6/ 10
त्यामुळे शाहरुखसमोर येताच तिनं आपल्या करिअरबाबत त्याच्याकडे सल्ला मागितला. त्यानं देखील तिला असा एक सल्ला दिला ज्यामुळं काही काळ तिच्या करिअरनं उंची गाठली पण नंतर मात्र आलेख खालच्या दिशेनं जाऊ लागला. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
7/ 10
“तुला दररोज 200 चित्रपटांच्या ऑफर मिळतील पण आपण केवळ दोनच चित्रपटांची निवड करायची. उगाच पैशांसाठी कुठलेही चित्रपट निवडण्याऐवजी चांगल्या पटकथांना प्राधान्य दे” असा सल्ला त्यानं दिला होता. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
8/ 10
अर्थात हा सल्ला वरकरणी योग्य होता. पण त्यामुळे अम्रितानं अनेक चित्रपटांना थेट नकार देण्यास सुरुवात केली. परिणामी निर्मात्यांमध्ये तिच्याबाबत काहीशी नकारात्मक भूमिका निर्माण झाली. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
9/ 10
तिनं आपल्या करिअरमध्ये ‘अब के बरस’, ‘विवाह’, ‘दिवार’, ‘विक्टरी’ यांसारख्या अनेक चांगल्या पटकथा असलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु या चित्रपटांना तिकिटबारीवर मात्र कमाल करता आला नाही. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
10/ 10
सध्या अम्रिता बॉलिवूडपासून दूर आहे अन् आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतीत करत आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)