मुंबई 2 जुलै**:** ‘ऑस्कर’ (Oscar) हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. त्यामुळे जगभरातील कलाकार ऑस्कर मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करताना दिसतात. ‘ऑस्कर’ नावाचा परिस जोडला गेला की करिअरचं सोनं होतं असं म्हणतात. अन् या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात मतदान करण्यासाठी यंदा बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) आणि निर्माती एकदा कपूर (Ekta Kapoor) यांना आमंत्रण मिळालं आहे. या दोघांचा ऑस्करसाठी नामांकन देणाऱ्या समिक्षकांच्या यादीत सामावेश करण्यात आला आहे. ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची निवड कशी केली जाते**?** ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची निवड या संस्थेतर्फे निवडलेले चित्रपट समिक्षक करतात. या संस्थेचे सदस्य दरवर्षी जगभरातील चित्रपट स्पर्धांना गुप्तपणे हजेरी लावतात. आणि तेथील चित्रपट समिक्षकांचे निरिक्षण करतात. त्यांच्या लिखाणाची पद्धत, विचार करण्याची शैली, तटस्थपणा आणि इतर काही गुण यांच्या जोरावर काही मोजक्या समिक्षकांची निवड केली जाते. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या संजना गलराणीनं केलं गुपचूप लग्न; पतीसाठी स्विकारला मुस्लिम धर्म
‘आत्महत्या की हत्या’ पोलिसांचा शोध सुरु; ‘नवे लक्ष्य’ उलघडणार सत्य 2020च्या आकडेवारीनुसार 5835 समिक्षक होते. यंदाच्या वर्षी या समिक्षकांच्या यादीत 52 देशांतील आणखी 395 समिक्षकांची वाढ झाली आहे. अन् आनंदाची बाब म्हणजे या समिक्षकांमध्ये दोन विद्या बालन आणि एकता कपूर हे दोन भारतील कलाकार देखील सामिल आहेत. चाहत्यांनी या दोन्ही कलाकारांवर सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे.