मुंबई, 2 जुलै- पोलिसांच्या कार्याचा आढावा घेणारी आणि गुन्हेगारांना जेरबंद करणारी ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) ही मालिका (Marathi Serial) नुकताच आपल्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या सुरुवाती भागांनीचं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. सध्या मालिकेतील पोलीस म्हणजेच युनिट 9 शिखा नावाच्या कॉलेज गर्लची केसमध्ये व्यग्र आहेत. शिखाचा मृत्यू आत्महत्या की हत्या याचा शोध हे लोक घेत आहेत.
स्टार प्रवाहवरील मालिका ‘नवे लक्ष्य’ नुकताचं आपल्या भेटीला आली आहे. मालिकेच्या पहिल्या काही भागांनीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सध्या मालिकेचा एक नवा प्रोमो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पोलीस शिखा नावाच्या एका कॉलेज गर्लच्या मृत्यूचा छडा लावताना दिसून येतं आहेत. शिखा ही हॉस्टेलवर राहत असलेली मुलगी असते. तिचा अचानक मृत्यू होतो. मात्र तिच्या संशयास्पद मृत्यूने हॉस्टेलचे कर्मचारी ते तिच्या मैत्रिणी सर्वचजण संशयाच्या जाळ्यात येतात. आत्ता पोलीस या मृत्यू मागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. असा हा रंजक प्रोमो सध्या व्हायरल होतं आहे. (हे वाचा: VIDEO: मनू-अनिची गंमत जंमत; दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीची होतेय चर्चा ) याआधी स्टार प्रवाहवर ‘लक्ष्य’ ही मालिका प्रसारित होतं होती. त्याचं पार्श्वभूमीवर आधारलेली अर्थातच त्याचाचं नवा सिझन म्हणजे ‘नवे लक्ष्य’ ही मालिका आहे. यामध्ये ‘युनिट 9’ च्या कार्याचा आढावा दाखवण्यात आला आहे. पोलीस आणि त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी त्यातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका आहे. (हे वाचा: सई लोकूरचा कोल्हापुरी तडका; VIDEO पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ) या मालिकेची निर्मिती होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन हाउसने केली आहे. तसेच या मालिकेतून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सोहमनेसुद्धा मनोरंजन विश्वात आपली घौडदौड सुरु केली आहे.