• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या संजना गलराणीनं केलं गुपचूप लग्न; पतीसाठी स्विकारला मुस्लिम धर्म

ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या संजना गलराणीनं केलं गुपचूप लग्न; पतीसाठी स्विकारला मुस्लिम धर्म

संजनानं आपल्या पतीसमवेतचे काही फोटोही शेअर केले असून, हे फोटो सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहेत. यामध्ये ती पारंपरिक पोशाखात असून अतिशय सुंदर दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई 2 जुलै: सँडलवुड ड्रग्ज रॅकेट प्रकरणामुळे तुरुंगाची हवा खाणारी कन्नड अभिनेत्री संजना गलराणी (Sanjjanaa Galrani) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिनं आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली असून, त्यामुळं सोशल मीडियावर (Social Media) तिची चर्चा सुरू आहे. संजनानं आपल्या पतीसमवेतचे काही फोटोही शेअर केले असून, हे फोटो सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहेत. यामध्ये ती पारंपरिक पोशाखात असून अतिशय सुंदर दिसत आहे. गुरुवारी, 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे (National Doctor’s Day) औचित्य साधून तिनं आपल्या लग्नाची बातमी जाहीर केली आहे. संजनानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात तिनं स्वत:ला ‘डॉक्टरची पत्नी’ म्हणजेच डॉ. अजीज पाशा यांची पत्नी म्हटलं आहे. यावरूनच तिनं डॉ. अजीज पाशा यांच्याशी लग्न केल्याचं स्पष्ट झालं आहे. सँडलवुड ड्रग्ज रॅकेट प्रकरणावेळी तिनं आपण डॉ. अजीज पाशा (Dr. Aziz Pasha) यांच्याशी साखरपुडा केल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांनी लग्न केल्याची गोष्ट अद्याप गुप्तच ठेवली होती. दरम्यान, 2018 मध्ये आपण इस्लाम धर्म (Islam) स्वीकारल्याचंही तिनं सांगितलं. मात्र तेव्हा आपण डॉ. पाशा यांच्याशी लग्न केलं नव्हतं तर फक्त धर्मांतर केलं होतं, असंही तिनं स्पष्ट केलं. डॉ. पाशा यांना आपण वयाच्या 16 व्या वर्षापासून ओळखत असल्यानं त्यांच्याशी लग्नाचा निर्णय घेणं अजिबात कठीण गेलं नाही, असंही संजनानं म्हटलं आहे. लग्नानंतर यामी गौतमला EDचा दणका; आर्थिक गैरव्यहार प्रकरणी पाठवलं समन्स
  ब्रिटनी प्रकरणात शिबानी दांडेकरची उडी; करतेय महिलांच्या स्वातंत्र्याची मागणी आपल्या लग्नाबाबत स्पॉटबॉय शी बोलताना तिनं सांगितलं की, ‘आम्ही लग्नाची बातमी गुप्त ठेवलेली नाही; पण आम्ही ती जगाला सांगणंही आवश्यक मानलं नाही, इतकंच. आमच्या लग्नाला कुटुंबातील फक्त 4 लोक उपस्थित होते. सध्याच्या कोरोना साथीच्या परिस्थितीमुळे आम्ही कोणताही भव्य सोहळा आयोजित केला नाही. माझ्या लग्नासाठी ठेवलेली सर्व रक्कम मी कन्नड चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञांना मदत करण्यासाठी दान केली आहे. लग्नाच्या पार्टीच्या पैशातून मी गरजू लोकांना रेशन किटचे (Ration kit) वितरण केलं.’ ‘श्रीमंतांना बोलावून त्यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेल बुक करण्यापेक्षा आणि बिर्याणी खाण्यापेक्षा गरीबांना मदत करणं अधिक चांगलं आहे, असं मला वाटलं. बिर्याणीच्या एका प्लेटच्या किंमतीत, त्या लोकांसाठी 5 दिवसांचं जेवण आलं. माझ्या या निर्णयाला डॉ. अजीज यांनीही पाठिंबा दिला,’ असंही संजनानं सांगितलं. संजना याआधी एका कन्नड रिअॅलिटी शोमध्ये आणि ‘मुझसे शादी करोगे’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.
  First published: