मुंबई 7 मार्च: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या जनतेने जो बायडन (Joe Biden) यांची निवड केली आहे. अत्यंत रंगतदार झालेल्या लढतीत जो बायडन यांनी रोमहर्षक विजय मिळवला. विजयी होताच केलेल्या भाषणात त्यांनी भारतीयांची प्रचंड स्तुती केली. या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत अभिनेता सुनिल शेट्टी (Sunil Shetty) यानं जो बायडन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. मात्र त्याचं हे कौतुक अभिनेता कमाल आर. खानला (Kamaal R Khan) आवडलं नाही. तुला कधीपासून अमेरिकन लोकांनी भारतीयांची केलेली स्तुती आवडू लागली? असा उपरोधिक टोला त्यानं लगावला आहे. “भाईजान सुनिल शेट्टीजी जेव्हा रिहानानं भारताबद्दल मत व्यक्त केलं होतं तेव्हा तुम्ही तिच्यावर जोरदार टीका केली होती. अमेरिकन नागरिकांना भारतीयांबद्दल काहीच बोलण्याचा अधिकार नाही असं तुम्ही म्हणाला होता. अन् आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी भारतीयांचा उल्लेख केला तेव्हा मात्र तुम्ही स्तुतीसुमनं उधळत आहात. जर तुम्हाला स्तुती होणं आवडतं तर तुम्ही टीका सहन करणं देखील शिकायला हवं.” अशा आशयाचं ट्विट करुन कमाल खाननं सुनिल शेट्टीवर निशाणा साधला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा - ‘कोरोनाबाबत भारताचा प्रस्ताव स्विकारु नका’, जो बायडेन यांच्याकडे मागणी जो बायडन यांचं खास नातं आहे भारतीयांशी जो बायडन यांचे पूर्वज 1873 साली ब्रिटन येथून ईस्ट इंडिया कंपनीसोबत भारतात आले होते. तेव्हापासून ते नागपुरात राहतात. त्यापैकी लेस्ली बायडन यांनी जो बायडन यांना 1881 साली पहिल्यांदा पत्र पाठवलं होतं. दोघांदरम्यान झालेल्या पत्रव्यवहारात त्यांनी त्यांच्या नातेवाइकांबाबत चर्चा केली होती. लेस्ली बायडन त्यांचे नातू नागपुरात राहतात. ते 1873 पासून येथे वास्तव्यास असल्याचे सांगतात. त्यापैकी सोनिया बायडन फ्रान्सिस यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीवरील बातमीला दुजोरा दिला. सोनिया या प्रसिद्ध मनोसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लेस्ली बायडन हे भारत लॉज येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांचा मृत्यू 1883 रोजी झाला.