JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi Javed : दीपिकानंतर उर्फीवरही चढला बेशरम रंग; भगव्या कपड्यातील 'तो' Video चर्चेत

Urfi Javed : दीपिकानंतर उर्फीवरही चढला बेशरम रंग; भगव्या कपड्यातील 'तो' Video चर्चेत

उर्फीनं भगव्या रंगाचे विचित्र कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जाहिरात

उर्फी जावेद ऑरेंज ड्रेस व्हिडीओ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 जानेवारी : अभिनेत्री उर्फी जावेद सध्या चांगलीच चर्चेत आहे.  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेनंतर उर्फी आणि चित्रा वाघांमध्ये चांगलंच ट्विटर वॉर पाहायला मिळालं. उर्फी तिच्या विचित्र फॅशन स्टाइलमुळे वादात सापडली आहे. अशातच उर्फीवर आता दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाण्याचा रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे. पठाण सिनेमातील बेशरम रंग या गाण्यात भगव्या रंगाची बिकिनीवरून चांगलाच रान उठलं होतं. दीपिका च्या बिकिनीवरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अशातच आता हा वाद पुन्हा पुढे येण्याची शक्यता आहे. कारण आता उर्फीनं भगव्या रंगाचे विचित्र कपडे घालून बेशरम रंग गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी उर्फीला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. उर्फीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत.   तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये भगवा रंगाचा कट आऊट बोल्ड ड्रेस घातला आहे. व्हिडीओच्या बॅक ग्राऊंडला बेशरम रंग हे गाणं वाजताना दिसत आहे. गाणं सुरू होताच उर्फी भगव्या ड्रेसमध्ये समोरून चालत येतेय.  उर्फीनं व्हिडीओबरोबर काहीच कॅप्शन लिहिले नाहीत. मात्र कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी उर्फीची चांगलीच शाळा घेतली आहे. हेही वाचा -  Uorfi Javed Controversial Outfits : उर्फीच्या कपड्यांच्या छप्पन तऱ्हा, पाहा तिचे Top 10 बोल्ड लुक विचित्र कपडे घालून रिल्स शेअर करणं हे उर्फीसाठी काही नवीन नाहीये. तसंच तिच्या फॅशन स्टाइलमुळे तिला ट्रोल करणं देखील नवीन राहिलेलं नाहीये. पण भगव्या रंगाचे कपडे आणि त्यात बेशरम रंग या गाण्यामुळे ती नेटकऱ्यांच्या चांगलीच कचाट्यात सापडली आहे.

संबंधित बातम्या

उर्फीच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, ‘हिने जाणून बुजून भगव्या रंगाचे कपडे घातले आहेत’. तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘ही फक्त कॉन्ट्रोवर्सीसाठी भगव्या रंगाचे कपडे घालते. हिला फक्त सर्वांचं अटेंशन हवं असतं’. तर आणखी एका युझरनं म्हटलंय, ‘प्रसिद्धी मिळवण्यासाठी भगव्या रंगाचे कपडे घालते. ही पॉर्न स्टार्सनाही मागे टाकते’.

पठाण सिनेमातील या बेशरम रंग गाण्यामुळे भगवा रंगांची बिकिनी घालून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. पठाण सिनेमा रिलीजच्या आधी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला. तेव्हा सेन्सॉरनं सिनेमातील काही दृश्य काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. आता सिनेमातील कोणता भाग किंवा गाणं किंवा गाण्यातील दृश्य काढून टाकण्यात आलीत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या