बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर ट्रेंड होण्यासाठी काही वेगळं कारण लागत नाही.
उर्फी नको तिथे तिच्या बोल्डनेस अदा दाखवत असते.
यावेळीनं तिनं बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा सोडल्यात. थेट टॉपलेस होत उर्फी नाश्ता करायला बसली.
एका हातात पॅनकेक डिश आणि एका हातात ज्युस घेत उर्फीनं फोटोशूट केलंय.
या अवतारात नेहमीप्रमाणे उर्फीला चांगलेच खडेबोल सुनावलेत.
याआधी दिवाळीतही तिनं टॉपलेस होत लाडू खाताना शुभेच्छा दिल्या होत्या.
हिंदूंच्या सणाला कपडे काढून आणि ईदच्या दिवशी सलवार कुर्ता घालून शुभेच्छा देणाऱ्या उर्फीवर अनेकांनी सडकून टिका केलीये.
‘ही तर मुलगीच नाहीये’, असं अनेकांनी म्हटल ताशेरे ओढलेत.
तर काहींनी ‘हे सगळं अफगाणिस्तानमध्ये जाऊन करून दाखव’, असंही म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.