बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणवर आज चाहते प्रेमाचा आणि शुभेछांचा वर्षाव करत आहेत. दीपिकाने 'ओम शांती ओम' चित्रपटातून शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ही अभिनेत्री तब्बल 15 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. या काळात तिने अनेक बिग बजेट सिनेमे दिले आहेत. तसेच ती कंपन्यांची ब्रँड अँबॅसिडर आहे. त्यामुळे ती कोट्यावधींचं मानधन घेते. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत.
दीपिका पादुकोण फक्त चित्रपटांवरच अवलंबून नाही. तर ती अनेक हेल्थ,ब्युटी ,फूड,फॅशन अशा जाहिराती बनवणाऱ्या कंपन्यांची ब्रँड अँबॅसिडर आहे. ती अफाट जाहिराती करत असते. यातून तिला कोट्यवधी रुपये मिळतात.
दीपिका पादुकोणचा नेट वर्थ तब्बल 100 कोटींचा आहे. ती एका जाहिरातीसाठी 8 कोटी रुपये घेते. तसेच ती चित्रपटासाठी 12 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त मानधन घेते. दीपिकाला फोर्ब्सच्या सेलेब लिस्टमध्ये 10 क्रमांक मिळाला होता. 2018मध्ये ती चौथ्या क्रमांकावर होती.
दीपिका पादुकोण मुंबईत एका लग्जरी घरात राहते. हे घर 2776 चौरस फुटात विस्तारलेलं आहे. या घरची किंमत तब्बल 16 कोटी आहे.
दीपिका पादुकोणला दागिन्यांचीसुद्धा आवड आहे. तिच्या साखरपुड्याची अंगठीच 2 कोटींची आहे. शिवाय तिच्याजवळ लाखो रुप्याचे दागिने, बूट,ड्रेस, कोट अशा विविध वस्तू आहेत. दीपिका पादुकोणजवळ 8 लाखाची सुंदर बॅगसुद्धा आहे.