JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘हे बुटी शेक काय आहे?’ आशा भोसलेंच्या आवाजात जॅमीनं उडवली टोनीची खिल्ली

‘हे बुटी शेक काय आहे?’ आशा भोसलेंच्या आवाजात जॅमीनं उडवली टोनीची खिल्ली

विनोदवीर जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर हिनं देखील या गाण्यावरुन टोनीची जोरदार खिल्ली उडवली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिनं चक्क आशा भोसले (asha bhosle voice) यांची नक्कल करत टोनीला रोस्ट केलं आहे. (booty shake song roast)

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 मार्च: प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर (Tony Kakkar) आपल्या गाण्यांमुळं सतत चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांत त्याची ‘धिमे धिमे’, ‘चॉकलेट’, ‘कोका कोला’, ‘शोना शोना’ यांसारखी अनेक गाणी रसिकांच्या भेटीस आली आहेत. मात्र यापैकी ‘बुटी शेक’ हे गाणं सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चित्रविचित्र लिरिक्समुळं या गाण्याला अनेकांनी ट्रोल केलं. अगदी विनोदवीर जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी लिव्हर हिनं देखील या गाण्यावरुन टोनीची जोरदार खिल्ली उडवली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिनं चक्क आशा भोसले (Asha Bhosle voice) यांची नक्कल करत टोनीला रोस्ट केलं आहे. (booty shake song roast) जॅमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॅमी लोकप्रिय गायिका आशा भोसले यांची मिमिक्री करताना दिसत आहे. “नेहा कक्करचा भाऊ टोनी आहे ना त्याला मी टोनू अशी हाक मारते. त्याची गाणी खूप छान असतात. चला त्याचं एखादं गाणं ऐकूया.” असं म्हणत तिनं टोनीचं बुट्टी शेक हे गाणं प्ले केलं. पुढे ते गाणं ऐकून म्हणाली, “मिल्क शेक ऐकलंय, वेनिला शेक सुद्धा ऐकलंय, आज काल तर प्रोटिन शेकसुद्धा आलंय…पण हे बुटी शेक काय आहे? याला आता जडीबुटी शेक द्यावच लागेल.” असं म्हणत तिनं टोनीची खिल्ली उडवली आहे. अवश्य पाहा - बॉलिवूडच्या किसिंग क्वीनला करायचंय पुनरागमन; 18 किलो वजन केलं कमी

संबंधित बातम्या

अवश्य पाहा - असा होणार देवमाणूस मालिकेचा शेवट; महाएपिसोड झाला लीक? टोनीनं गायक होण्यापूर्वी एक स्टॅंडअप कॉमेडियन म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं जॅमीने ‘किस किस को प्यार करूं’ आणि ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘हाऊसफुल ४’ मध्ये तिने गिगलीची भूमिका साकारली होती. सध्या संगीतकार म्हणून चर्चेत आहे. तो हनी सिंगप्रमाणेच रॅप सॉन्ग तयार करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या