JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कोण होत्या सुमित्रा भावे? महाराष्ट्रानं गमावली समाजसुधारणेसाठी धडपडणारी दिग्दर्शिका

कोण होत्या सुमित्रा भावे? महाराष्ट्रानं गमावली समाजसुधारणेसाठी धडपडणारी दिग्दर्शिका

लाखोंची नोकरी सोडून विद्यार्थ्यांसाठी झटणारी शिक्षिका; पाहा सुमित्रा भावे यांचा थक्क करणारा प्रवास

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 एप्रिल**:** सुमित्रा भावे (Sumitra Bhave) या भारतीय मनोरंजनसृष्टीतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. आज त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळं एक मोठा धक्का महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि सामाजिक विश्वाला बसला आहे. (Sumitra Bhave passes away) कारण त्या केवळ एक दिग्दर्शिकाच नव्हत्या, तर कित्येक कलावंतांना, विद्यार्थांना, गरीबांना मदत करणाऱ्या त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या देखील होत्या. अनेक नामांकित सेलिब्रिटी एखाद्या कार्यक्रमात नुसती हजेरी लावण्यासाठी लाखो रुपयांचं मानधन घेतात. परंतु सुमित्रा भावे यांनी मात्र एक पैशांचंही मानधन न घेता सामाजिक संस्थांसाठी कित्येक वर्ष काम केलं. (social worker Sumitra Bhave) असं हरहुन्नरी व्यक्तीमत्व गमावल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात सध्या शोककळा पसरली आहे. सुमित्रा यांचा जन्म 12 जानेवारी 1943 साली पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्याकाळी स्त्रियांना फारसं शिक्षण दिलं जात नव्हतं. परंतु सुमित्रा यांचे वडील पाश्चात्य विचारांनी प्रेरित होते. त्यामुळं त्यांना हवं ते शिकण्याचं स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली. त्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमित्रा यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये कुठलाही मोबदला न घेता काम केलं. हे काम सुरु असतानाच त्यांचं लक्ष सिनेसृष्टीच्या दिशेनं वळलं. चित्रपट माध्यमाची ताकत कळल्यानंतर त्यांनी दिग्दर्शिका म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.  वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या. अवश्य पाहा - ‘IPL पेक्षा अधिक पैसा इथं लागलाय’; बेजबाबदार क्रिकेटवीरांवर मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या. त्यांनी एकूण सुमारे 14 चित्रपट, 50 हून अधिक लघुपट आणि चार मालिकांची निर्मिती केली. यामध्ये प्रामुख्यानं ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट विशेष गाजले. या चित्रपटांसाठी त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी देखील गौरवण्यात आलं होतं. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं मनोरंजनसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटीं सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहून आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या