मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘IPL पेक्षा अधिक पैसा इथं लागलाय’; बेजबाबदार क्रिकेटवीरांवर मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप

‘IPL पेक्षा अधिक पैसा इथं लागलाय’; बेजबाबदार क्रिकेटवीरांवर मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप

अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत.

अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत.

अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत.

मुंबई 18 एप्रिल: कोरोना विषाणूचं सक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाउनचा पर्याय स्विकारला. मात्र असं असताना देखील काही लोक बेजाबदारपणे घराबाहेर चक्क क्रिकेट खेळताना दिसत आहेत. या क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर मराठी अभिनेत्री हेमांगी कवी संतापली आहे. “IPL पेक्षा अधिक पैसा इथं लागला आहे.” असं म्हणत तिनं आपला राग व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाली हेमांगी?

हेमांगीनं फेसबुकच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळात क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवर जोरदार टीका केली आहे. तिनं

1) IPL पेक्षा ही जास्त पैसा इथे लागलेला आहे

2) रस्त्यावर यायच्या आधी 14 दिवस यांना quarantine करण्यात आलं होतं

3) दर ७२ तासांनी या सर्व खेळाडूंची RTPCR test करण्यात येते

4) दर 1 तासाने Bat आणि Ball sanitize करण्यात येत आहेत

5) मास्क न लावता खेळण्याची परवानगी काढण्यात आलेली आहे ( मास्क घालून कसं खेळणार, runs कमी नाही का होणार, वेडीच आहे मी)

6) Break Time मध्ये शक्तिवर्धक काढा पेय म्हणून देण्यात येत आहे!

7) खेळून झाल्यावर या सर्व खेळाडूंना social bubble मध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे

8) Background ला दर 2 तासांनी ambulance च्या आवाजाने खेळाची रंजकता अजूनच वाढतेय!

9) तर, कळवण्यात अत्यंत आनंद होतोय की lockdown अजून 15 दिवस काय 15 वर्ष लागला तरी काही हरकत नाही!  त. टी.: खेळा cricket ... काढा corona ची wicket! - एक जबाबदार (जळखाऊ) नागरिक! अशी पोस्ट करुन लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर राग व्यक्त  केला आहे.

अवश्य पाहा - ‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील?’; 40 वर्षीय श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक

कोरोनानं घेतले 1 लाख 75 हजार 649  बळी

देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 कोटी 45 लाख 26 हजार 609 इतका झाला आहे. यापैकी आजपर्यंत 1 कोटी 26 लाख 71 हजार 220 रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील झाले आहेत. मात्र, अजूनही देशात 16 लाख 79 हजार 740 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आणि त्यामध्ये रोज नव्या रुग्णांची भर पडत आहेत. त्यासोबतच देशात आजपर्यंत कोरोनामुळे तब्बल 1 लाख 75 हजार 649 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारला गांभीर्याने पावलं उचलण्याची अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Entertainment, IPL 2021, Marathi actress